अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा हाॅटेलमधील ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, अभिनेत्रीने..
अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. शेवटी तिचा जिरो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, त्या चित्रपटाला म्हणाला तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. परिणामी तो चित्रपट फ्लाॅप गेला. तेंव्हापासूनच अनुष्का शर्मा ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडचा सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहली याने विक्रमी खेळी खेळत 50 वे शतक पूर्ण केले. विराट कोहली याच्या जबरदस्त कामगिरीवर अनुष्का शर्मा चांगलीच खुश झाली आणि तिने भर मैदानात विराट कोहली हिला फ्लाइंग किस दिली. याचेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे हाॅटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
सामना झाल्यानंतर विराट कोहली टीमसोबत आणि अनुष्का शर्मा हिच्यासोबत हाॅटेलमधून बाहेर पडताना दिसतोय. यावेळी दोघांनीही एकमेकांच्या हातामध्ये हात घातल्याचे या व्हिडीओमध्ये दिसतंय. लोकांना हा व्हिडीओ आवडला असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
विराट कोहली याने 50 वे शतक पूर्ण केल्यानंतर अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियावर अत्यंत खास अशी पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये ती विराट कोहली याचे काैतुक करताना दिसलीये. अनुपम खेर यांनी देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट शेअर केली. अनुपम खेर यांनी थेट आम्हा भारतीयांना याचा अभिमान आहे, असे म्हटल होते.
View this post on Instagram
काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, अनुष्का शर्मा ही दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार आहे. काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. एका व्हिडीओमध्ये तर अनुष्का शर्मा हिचा बेबी बंप देखील दिसत होता. अनुष्का शर्मा ही त्यावेळी बेबी बंप लपवताना दिसली. यामुळे अनेक चर्चा रंगताना दिसल्या. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका आहे.
वामिका हिची एकही झलक चाहत्यांना बघायला मिळाली नाहीये. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलीचा एकही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला नाहीये. मात्र, एका सामन्यामध्ये वामिका कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून सतत बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. शेवटी 2019 मध्ये तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
