AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार

33 वर्षांपूर्वी मालिकी, ज्याचे 52 भाग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कलाकाराला मारूती कार भेट देण्यात आली होती. या मालिकेत होते तब्बल 73 कलाकार. कोणती आहे ती मालिका?

33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 23, 2026 | 6:28 PM
Share

दूरदर्शनच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मालिकांमध्ये ‘देख भाई देख’ या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. 1993 मध्ये सुरू झालेली ही मालिका 1994 पर्यंत प्रसारित झाली आणि दीवान कुटुंबातील तीन पिढ्यांच्या गमती-जमतींनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेला IMDb वर 8.6 असे रेटिंग मिळाले आहे.

‘देख भाई देख’चे दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केले होते. त्यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत मालिकेची निर्मितीही केली. विशेष म्हणजे ही मालिका दूरदर्शनसाठी सुरुवातीपासून तयार करण्यात आलेली नव्हती; मात्र डीडी मेट्रोवर प्रसारित झाल्यानंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

या मालिकेत तब्बल 73 कलाकारांनी काम केले होते. नवीन निश्चल, देवेन भोजानी, शेखर सुमन, फरीदा जलाल, भावना बलसावर, उर्वशी ढोलकिया, सुषमा सेठ, सतीश शाह, जतिन कनकिया, अनंत महादेवन यांसारख्या कलाकारांनी आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.

सर्व कलाकारांनी दिलेली मारूती कार भेट

मालिकेची कथा आनंद महेंद्रू यांनी आपल्या कुटुंबापासून प्रेरणा घेऊन तयार केली होती. त्यांच्या कुटुंबात मोठ्या संख्येने मुले असल्याने त्यांनी त्यांच्यावर आधारित पात्रांची रूपरेषा तयार केली. फरीदा जलाल यांच्या भूमिकेसाठी त्यांनी आपल्या आईकडून, तर शेखर सुमन यांच्या व्यक्तिरेखेसाठी आपल्या काकांकडून प्रेरणा घेतली होती.

मालिका सुपरहिट झाल्यानंतर आनंद महेंद्रू यांनी 52 व्या भागानंतर संपूर्ण कलाकारांना मारुती कार भेट म्हणून दिल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही, तर त्यांनी संपूर्ण टीमला स्वतःच्या खर्चाने लंडनची सहलही घडवून आणली होती.

शूटिंग दरम्यान कलाकारांना करावा लागला अडचणींचा सामना

मात्र या मालिकेच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना मोठ्या अडचणींचाही सामना करावा लागला. आर.के. स्टुडिओमध्ये शूटिंग होत असताना त्या काळात पंखे किंवा एसीची सुविधा नव्हती. मोठ्या लाईट्समुळे स्टुडिओमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत असे. त्यामुळे काही कलाकारांना शूटिंगदरम्यान चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचेही सांगितले जाते.

आज या मालिकेतील अनेक कलाकार अभिनयापासून दूर आहेत, तर काहींचे निधन झाले आहे. नवीन निश्चल यांचे 2011 मध्ये, शम्मी यांचे 2018 मध्ये आणि जतिन कनकिया यांचे 1999 मध्ये निधन झाले. मालिकेतील लोकप्रिय कलाकार सतीश शाह यांचेही 2025 मध्ये निधन झाले. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील नाती, हास्यविनोद आणि घरातील रोजच्या गमती-जमती यामुळे ही मालिका आजही तितकीच आपलीशी वाटते.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु