AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खानचं पहिलं प्रेम होती ही महिला, 60 चित्रपट आणि 40 मालिकांमध्ये केलंय काम

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अशी एक अभिनेत्री आहे जिचे नाव सैफ अली खानसोबत जोडले गेले आहे. जिने 60 चित्रपट आणि 40 टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

सैफ अली खानचं पहिलं प्रेम होती ही महिला, 60 चित्रपट आणि 40 मालिकांमध्ये केलंय काम
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 21, 2026 | 7:23 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशा अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. मात्र काळाच्या ओघात त्या लाइमलाइटपासून दूर गेल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मुनमुन सेन. तिचे आयुष्य चित्रपट, नाती आणि राजघराण्याच्या पार्श्वभूमीचा एक अनोखा संगम राहिले आहे.

मुनमुन सेनने 20 हून अधिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले असून सुमारे 60 चित्रपट आणि 40 टीव्ही मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्या दिग्गज अभिनेत्री सुचित्रा सेन यांच्या कन्या आहे.

अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये केलंय काम

तिच्या कारकिर्दीत तिने हिंदीसह बंगाली, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला नंदी स्टेट अवॉर्ड, कालकेंद्र स्क्रीन अवॉर्ड आणि भारत निर्माण अवॉर्ड यांसारखे अनेक सन्मान मिळाले आहेत.

मुनमुन सेनचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच चर्चेत राहिले आहे. तिचे लग्न 1978 साली भारत देव वर्मा यांच्याशी झाले, जे त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्या सासू इला देवी या कूचबिहारच्या राजकन्या होत्या, तर गायत्री देवी या त्यांच्याशी नात्याने संबंधित होत्या. या राजेशाही पार्श्वभूमीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेच आकर्षण दिसून येते.

सैफ अली खानसोबत जोडलेले नाव

तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा चर्चा रंगल्या. 1990 च्या दशकात तिचे नाव सैफ अली खानसोबत जोडले गेले होते. मात्र, तिने आपल्या कुटुंबासोबत स्थिर आयुष्य निवडले. मुनमुन सेनच्या दोन मुली रायमा सेन आणि रिया सेन या देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

एकेकाळी चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या मुनमुन सेन आता फार कमी चित्रपटांमध्ये दिसते. ती अधूनमधून इव्हेंट्स, पेज-3 पार्ट्या आणि सोशल कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावते. तिला पेंटिंग आणि अँटिक वस्तूंचा संग्रह करण्याची विशेष आवड आहे.

शिक्षणातही तिने उत्तम प्रगती केली असून त्यांनी Jadavpur University येथून कंपेरेटिव लिटरेचरमध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे. सध्या ती बंगाली पाककृतींवर आधारित कुकबुक तयार करण्यावर काम करत आहेत. जरी ती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिचे नाव आजही चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. तिच्या अभिनयाचा ठसा आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

Follow Us
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?
7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार..
मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार....
महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ
Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...