AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमानच्या चाहत्यांचा पराक्रम; ‘टायगर 3’चा शो सुरू असताना थिएटरमध्येच फोडले फटाके

सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून मालेगावच्या थिएटरमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मालेगावमधल्या मोहन थिएटरमध्ये चाहत्यांनी चित्रपट सुरू असताना फटाके फोडले. यावेळी थिएटरमधील इतर प्रेक्षक स्वत:चा बचाव करण्यासाठी इथेतिथे पळत सुटले.

सलमानच्या चाहत्यांचा पराक्रम; 'टायगर 3'चा शो सुरू असताना थिएटरमध्येच फोडले फटाके
Tiger 3Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2023 | 3:11 PM
Share

मालेगाव : 13 नोव्हेंबर 2023 | अभिनेता सलमान खानचा ‘टायगर 3’ हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या एका थिएटरमध्ये चाहते फटाके फोडताना दिसत आहेत. मालेगावमधील मोहन सिनेमामधील ही घटना आहे. थिएटरमध्ये फटाके फुटत असताना इतर काही प्रेक्षक सुरक्षित ठिकाणी पळताना दिसत आहेत. अतिउत्साही चाहत्यांनी केलेल्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘टायगर 3’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 44 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. सलमान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. यात उत्साहाच्या भरात काही चाहत्यांनी थेट थिएटरमध्येच पडद्यासमोर फटाके फोडले. हे फटाके फुटत असताना थिएटरमध्ये असलेले काही प्रेक्षक स्वत:चा बचाव करण्यासाठी धावतानाही दिसत आहेत.

पहा व्हिडीओ

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. छावणी पोलीस ठाण्यात मोहन थिएटरविरोधात कलम 112 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं गेलंय. फक्त मालेगावमध्येच नाही तर देशातील इतर भागांतील थिएटरमध्येही सलमानच्या चाहत्यांनी फटाके फोडल्याच्या घटना घडल्या आहेत.

मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफसोबतच इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहेत. तर शाहरुख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय रेवती, सिमरन, रिधी डोग्रा, विशाल जेठवा, कुमूद मिश्रा, रणवीर शौरी आणि आमिर बशीर यांच्याही भूमिका आहेत. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा हा पुढील भाग आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....