कैची घेतली अन् गायिकेनं स्टेजवरच सर्वांसमोर कापले केस; काय आहे कारण?

'या' खास कारणासाठी गायिकेनं उचचलं महत्त्वाचं पाऊल; स्टेजवर कापले केस

कैची घेतली अन् गायिकेनं स्टेजवरच सर्वांसमोर कापले केस; काय आहे कारण?
Turkish singer Melek Mosso Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 7:47 PM

मुंबई- इराणमध्ये हिजाबचा वाद (Iran Hijab Protest) चांगलाच पेटला आहे. फक्त इराणमध्येच नाही तर इतर देशांमध्येही हिजाबविरोधातील मोहिमेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या वादात जवळपास 75 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 700 हून अधिक लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हिजाबविरोधातील या मोहिमेत इराणच्या महिलांना देशातील कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत आहे. अशातच आता एका तुर्की गायिकेनं (Turkish Singer) या मोहिमेला आपल्याच अंदाजात समर्थन दिलंय.

तुर्की गायिका मेलेक मोसोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर उभी असलेली मेलेक ही कैची हातात घेऊन आपले केस कापताना पहायला मिळत आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी मोहिमेला समर्थन देण्यासाठी तिने आपले केस कापले.

हे सुद्धा वाचा

इराणमध्ये 22 वर्षीय तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूनंतर या मोहिमेला सुरुवात झाली. महसाने योग्य पद्धतीने हिजाब परिधान केला नव्हता, म्हणून तिला पोलिसांनी अटक केली होती.

View this post on Instagram

A post shared by melek (@melekmosso)

13 सप्टेंबर रोजी ती तिच्या कुटुंबीयांसोबत सहज बाहेर फिरायला गेली होती. यादरम्यान तिने हिजाब नीट परिधान केला नाही म्हणून मॉरल पोलिसांनी महसाला अटक केली. इतकंच नव्हे तर तिला रि-एज्युकेशन सेंटरमध्ये खूप मारलं गेलं. यानंतरच तिची प्रकृती बिघडली आणि तिचं निधन झालं.

निधनापूर्वी महसा तीन दिवस कोमामध्ये होती. तिच्या निधनानंतर इराणमध्ये तीव्र संताप व्यक्त केला गेला. हळूहळू हिजाबविरोधातील ही मोहीम जगभरात पसरली. अनेक महिलांनी केस कापत या मोहिमेत भाग घेतला.

इराणमध्ये हिजाबसंदर्भात अत्यंत कठोर नियम बनवण्यात आले आहेत. याविरोधात असंख्य महिला या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. विविध सेलिब्रिटीसुद्धा त्याविरोधात आवाज उठवत आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.