अविवाहित असतानाही कोणाच्या नावाचे सिंदूर लावते ‘ही’ अभिनेत्री; नेटकऱ्यांनी घेतलं एजाज खानचे नाव
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया अविवाहित असतानाही सिंदूर का लावते असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले होते. एवढच नाही तर नेटकऱ्यांनी तिच्या लग्नाच्या अंदाज लावले होते. पवित्राने एक व्हिडीओ शेअर करत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

पती नसतानाही रेखा सिंदूर का लावतात असा प्रश्न कित्येकदा चाहत्यांनी उपस्थित केला असेल.पण रेखानंतर आता अजून एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. अविवाहित असतानाही ही अभिनेत्री कोणाच्या नावाचे सिंदूर लावते. असा प्रश्न कित्येकदा चाहत्यांनी उपस्थित केला.अखेर या अभिनेत्रीने स्वत:च व्हिडीओ बनवतं सोशल मिडीयावर याचा खुलासा केला आहे.
लग्न झाल्याच्या चर्चा
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.आता अजून एका विषयावरून ती चर्चेत आली आहे ते कारण म्हणजे अविवाहित असतानाही पवित्रा नेमकं कोणाच्या नावाचे सिंदूर लावते. एजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती तिच्या भांगेत सिंदुर लावताना दिसते. त्यामुळे तिचं लग्न झालं असल्याचं चाहत्यांना वाटू लागलं. पण जर तिचं लग्न झालं असेल तर तिचा नवरा कोण असाही प्रश्न चाहत्यांना पडत होता.
- Pavitra Punia told the reason behind applying Sindoor
अखेर पवित्राने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारे दिली आहेत. तसेच तिने तिच्या भांगेत सिंदुर भरण्याचे कारणही सांगितले आहे. पवित्राचे अजून लग्न झालेले नाही तरीही ती तिच्या भांगेत सिंदुर लावते.
काय म्हणाली पवित्रा?
पवित्राने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ‘माझ्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे. मी भांगेत सिंदुर भरते, अशी चर्चा आहे. पण मला ते खूप आवडतं. जे लोकं म्हणतायत की माझं लग्न झालं आहे, तर त्यांना मी सांगू इच्छिते की, मी हे सिंदुर धार्मिक रितीने लावते. माझं लग्न झालेलं नाही. मी दोन सिंदुर लावते, ज्याचा लग्नाशी काहीही संबंध नाही.’
- Pavitra Punia told the reason behind applying Sindoor
पुढे पवित्राने म्हटलं की, ज्या दिवशी माझं लग्न होईल, त्या दिवशी मी संपूर्ण जगाला या गोष्टीची कल्पना देईन. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांतता ठेवा. तुमचा सीट बेल्ट बांधून ठेवा. ज्या दिवशी माझं लग्न ठरेल त्या दिवशी मी सर्वांना आमंत्रण नक्की देईल.” असं म्हणत पवित्राने तिच्या भांगेतल्या कुंकाबद्दल खुलासा केला आहे. दरम्यान पवित्राचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. तिचे उत्तर ऐकूण नेटकऱ्यांनी मात्र तिचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
