Uorfi Javed | अखेर ‘त्या’ छेडछाडच्या प्रकरणावर सोडले उर्फी जावेद हिने माैन, थेट म्हणाली, माझ्या मागे पुढे कोणीच गॉडफादर…
उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद ही अनेकदा फक्त आणि फक्त तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. इतकचे नाही तर तिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या या तिच्या कपड्यांमुळे दिल्या जातात. मात्र, याचा फार काही परिणाम हा तिच्यावर होत नाही.

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अनेकदा उर्फी जावेद (Uorfi Javed) ही वादामध्ये अकडते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देण्यात आल्या आहेत. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिची तगडी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद ही दिसते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधूनच मिळालीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये.
काही दिवसांपूर्वीच थेट विमानामध्ये उर्फी जावेद हिच्यासोबत काही मुलांनी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडलीये. आता यावरच भाष्य करताना उर्फी जावेद ही दिसत आहे. नुकताच एक मुलाखत उर्फी जावेद हिने दिली आहे. या मुलाखतीमध्ये उर्फी जावेद ही काही मोठे खुलासा करताना दिसली आहे. विमानातील छेडछाडवर देखील तिने मोठा खुलासा केला.
उर्फी जावेद म्हणाली की, मी गोव्याला जात असताना काही मुले मला विविध नावाने बोलवत होते. इतकेच नाही तर ते माझ्यावर कमेंट देखील करत होते की, ही कपडेच घालत नाही, आज हिने कपडे कसे घातले आहेत. अशाप्रकारच्या विविध कमेंट ते सतत करत होते. मात्र, मी शांत होते कारण मला विमानामधील वातावरण हे अजिबातच खराब करायचे नव्हते.
शेवटी एक मुलगा माझ्याजवळ येऊन माझ्यासोबत चुकीचे वागत होता आणि मग माझा पारा चढला. ते मुले नशेमध्ये असल्याने त्यांना काहीच म्हणता आले नाही. मुळात म्हणजे नशेमध्ये असलेल्या लोकांना तुम्ही विमानामध्ये कसे येऊ दिले हेच मला कळाले नाही. मुळात म्हणजे मला अशा गोष्टींचा काहीच फरक हा पडत नाही.
माझ्यापेक्षा इतर काही लोकांना या गोष्टींचा अधिक फरक हा पडतो. माझ्या मागे पुढे कोणीच नाही, यामुळे लोकांची अशी हिंमत होते. बाॅलिवूडमध्येही माझा कोणीच गॉडफादर नसल्याचे देखील म्हणताना उर्फी जावेद ही दिसत आहे. मी नेहमीच सॉफ्ट टार्गेट असते, असेही उर्फी जावेद ही म्हणाली आहे. बाॅलिवूडमध्ये माझे कलेक्शन देखील नाहीये.
