उर्फी तिचा ड्रेस विकतेय; किंमत ऐकून चाहते शॉक, म्हणाले ‘EMIवर मिळेल का?’
उर्फी जावेदने तिचा एका ब्लॅक गाऊन विक्रीसाठी काढला आहे. पण या ड्रेसची किंमत ऐकून नेटकरी मात्र चांगलेच शॉक झाले आहे. सोशल मीडियावर तिच्या ड्रेसची आणि किंमतीची जोरदार चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी विनोदात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
उर्फी जावेद तिच्या चित्र-विचत्र कपड्यांच्या स्टाईलमुळे भलतीच फेमस आहे. उर्फी जेव्हा एखाद्या ठिकाणी पापाराझींना बोलावते किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाते तेव्हा सर्वांना हाच प्रश्न असतो की उर्फी आता कोणत्या प्रकारचा ड्रेस घालणार आहे. उर्फीने अगीद कागदापासून ते मोबाईपर्यंत अगदी सर्व वस्तूंचे, अनेक विविध प्रकारचे ड्रेस परिधान केले आहेत. पण उर्फीच्या अजून एका ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
उर्फीने चक्क तिच्या ड्रेस कलेक्शनमधील एक ड्रेस विकण्यास काढला आहे. याची माहिती तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ही माहिती दिली. उर्फी जावेदने शनिवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या ब्लॅक गाऊनचे फोटो शेअर केले होते. त्यावर तिने सांगितलं की, फुलपाखरं आणि पानं असलेला हा ड्रेस ती विकणार असल्याचे तिने सांगितले. पण या ड्रेसची किंमत ऐकून नेटकरी मात्र चांगलेच शॉक झाले आहे.
उर्फी जावेदने हा ड्रेस सर्वांना खूप आवडला पण त्याचा किंमत आहे 3,66,90000 रुपये, म्हणजे जवळपास 3 कोटी रुपये. हा ड्रेस कोणी विकत घेण्यास इच्छुक असल्यास त्याला DM करू शकता.’असही तिने सांगितले आहे.
View this post on Instagram
उर्फीची ही पोस्ट पाहून सर्वांनाच आश्चर्यच वाटलं. उर्फीच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडतोय. भन्नाट कमेंट तिच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. काहींनी तर तिला हा ड्रेस तु EMI वर देणार का असही विचारलं आहे, तर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, हा ड्रेस डायमंडचा आहे का? ज्याची किंमत 3 कोटी रुपये आहे. तरस यावर उर्फीच्याच बहिणीने कमेंट करत म्हटलं आहे की, “मी विकत घेतला असता पण माझ्याकडे एक डॉलर कमी आहे….”.
त्यामुळे आता उर्फीचा हा ड्रेस खरच कोण विकत घेतय का की उर्फी तिच्या चाहत्यांसाठी या ड्रेसची किंमत कमी करतेय याची सर्वच प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे कायमच चर्चेत असते आणि पुढेही ती राहणार आहे.