AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela | गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू, उर्वशीने गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चेला उधाण!

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू आणि साडी असा एखाद्या विवाहित महिलेचा सोज्वळ लूक दिसत आहे.

Urvashi Rautela | गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू, उर्वशीने गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चेला उधाण!
उर्वशी रौतेला
| Edited By: | Updated on: Apr 04, 2021 | 10:36 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते परंतु तिने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, यामुळे तिचे चाहते चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. या फोटोत  उर्वशी खूपच वेगळी दिसत आहे. सध्या उर्वशी रिषभ पंतसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. मात्र, आता तिने जो फोटो शेअर केला आहे, त्यात तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. यामुळे तिने गुपचूप लग्न उरकले की काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे (Urvashi Rautela share photo wearing mangalsutra and sindoor photo).

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू आणि साडी असा एखाद्या विवाहित महिलेचा सोज्वळ लूक दिसत आहे. रिषभ पंतबरोबर नाते तुटल्याने तिने लग्नाचे पाऊल उचलले का?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

पाहा उर्वशीची पोस्ट

शनिवारी अर्थात 3 एप्रिल रोजी उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत उर्वशी रौतेलाने गळ्यात मंगळसूत्र घातले असून, डोक्यावर सिंदूर लावले आहे. त्यात तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. फोटोमध्ये उर्वशी काहीतरी विचार करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मला एक वाईट सवय आहे जी, आजकाल सर्वांच्या आवडीची नाही. मी जे बोलते ते पूर्ण करते.’(Urvashi Rautela share photo wearing mangalsutra and sindoor photo)

रिषभ-उर्वशीच्या अफेअरची चर्चा

काही दिवसांपूर्वी रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या अफेअर्सच्या चर्चा मोठ्या जोरात सुरु होत्या. आता खुद्द उर्वशीनेच या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशीच्या एका फॅन्सने तिला इन्स्टाग्रामवर तुझा आवडता क्रिकेटर्स कोण आहे?, असा प्रश्न विचारला. त्यावर तिने उत्तर दिलं, मी क्रिकेट अजिबात बघत नाही. त्यामुळे मी क्रिकेटर्सला फारसं ओळखत नाही. असं सांगताना मात्र तिने सचिन सर आणि विराट सर यांचा मी खूप आदर करते, असं सांगायला विसरली नाही.

डेटवर जाताना पंत आणि उर्वशीचे फोटो व्हायरल

रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांना 2019 साली मुंबईच्या जुहूमधील एका हॉटेलमध्ये जाताना काही फॅन्सनी पाहिलं होतं. लेट नाईट डिनरसाठी रिषभ आणि रौतेला हॉटेलमध्ये गेले होते. ज्यानंतर त्यांच्यात खास रिलेशन असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. रौतेला आणि रिषभचे काही फोटोज देखील त्यावेळी व्हायरल झाले होते. यानंतर मीडिया रिपोर्टनुसार, रिषभने कानाला खडा लावत उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर त्यांची भेट झाली नाही.

रिषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं

रिषभ पंत श्रीलंका दौऱ्यावर होता. मात्र तिथे त्याचा परफॉर्मन्स म्हणावा असा होत नव्हता. त्यामुळे अंतिम 11 मध्ये त्याची जागा फिक्त होत नव्हती. याच टेंशनमधून त्याने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं, अशी चर्चा आहे.

(Urvashi Rautela share photo wearing mangalsutra and sindoor photo)

हेही वाचा :

Bollywood Corona | कलाकारांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ट, आदित्य नारायण-श्वेतालाही कोरोनाची लागण!

Vicky Kaushal  | विकी कौशल साकारणार ‘सॅम मानेकशॉ’, पुन्हा एकदा दिसणार जबरदस्त ‘आर्मी’ लूक!

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.