AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांसोबत वैर, सिनेमासाठी लिंग बदल, आज बॉलिवूडवर राज्य करतेय ‘ही’ बोल्ड अभिनेत्री

Actress Life: आज बॉलिवूडवर राज्य करणारी 'ही' अभिनेत्री हॉटेलमध्ये करायची नोकरी, वडिलांसोबत वैर ते सिनेमासाठी लिंग बदल... फार कमी लोकांना माहिती आहे अभिनेत्रीबद्दल महत्त्वाच्या गोष्टी... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

वडिलांसोबत वैर, सिनेमासाठी लिंग बदल, आज बॉलिवूडवर राज्य करतेय 'ही' बोल्ड अभिनेत्री
| Updated on: Aug 23, 2024 | 2:18 PM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आई – वडिलांच्या परवानगी शिवाय झगमगत्या विश्वात पदार्पण केलं आणि बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. अशाच एका अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री वाणी कपूर… वाणी कपूर हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आपल्या बोल्ड आणि हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या वाणी हिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांना माहिती नसतील. तर आज वाणीच्या वाढदिवशी तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ…

वाणी कपूर हॉटेलमध्ये करायची काम

वाणी कपूरने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) मधून पर्यटन विषयात पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जयपूरच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशिप केली. यानंतर वाणी कपूरने आयटीसी हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. हॉटेलमध्ये काम करत असताना वाणीच्या मनात सिनेमांप्रति प्रेम निर्माण झालं आणि अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Vaani Kapoor (@vaanikapoor)

वाणी कपूरचे वडिलांसोबत वाद

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाणीला फार मोठा त्याग करावा लागला. वडिलांच्या विरोधात वाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनय विश्वात ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्रीच्या आईने साथ दिली. पण वडिलांचा मात्र विरोध होता. वाणीने मॉडेलिंग केलेलं देखील अभिनेत्रीच्या वडिलांना आवडत नव्हतं… पण वाणीने वडिलांच्या रागाला सामोरं जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि स्वप्न पूर्ण केलं.

भूमिकेसाठी केलं लिंग बदल

मॉडेलिंग पासून सुरुवात करत वाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्रीने 2009 मध्ये छोट्या पडद्यापासून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्टारर ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमानंतर वाणीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमानंतर वाणी अनेक सिनेमांमध्ये झळकली. शिवाय ‘चंडीगढ़ करे आशिकी’ सिनेमात वाणीने अशा मुलीची भूमीका साकारली, जी लिंग बदल करुन मुलगी होते… आज वाणीला कोणत्या ओळखीची गरज नाही. वाणीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.