सलमानला स्टार बनवणारे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन

मुंबई: राजश्री प्रोडक्शनचे संस्थापक आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या (Raj Kumar Barjatya) यांचं आज निधन झालं. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडला फॅमिल फिल्म्स देणारे निर्माते, दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे ते वडील होते.  राजकुमार बडजात्या यांनीही बॉलिवूडमध्ये मोठं योगदान दिलं. राजश्री प्रोडक्शनने ट्विट करुन राजकुमार बडजात्या यांच्या निधनाचं वृत्त दिलं. It is …

सलमानला स्टार बनवणारे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन

मुंबई: राजश्री प्रोडक्शनचे संस्थापक आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या (Raj Kumar Barjatya) यांचं आज निधन झालं. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडला फॅमिल फिल्म्स देणारे निर्माते, दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे ते वडील होते.  राजकुमार बडजात्या यांनीही बॉलिवूडमध्ये मोठं योगदान दिलं.

राजश्री प्रोडक्शनने ट्विट करुन राजकुमार बडजात्या यांच्या निधनाचं वृत्त दिलं.

राजकुमार बडजात्या यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली. समीक्षक आणि ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श यांनी राजकुमार बडजात्या यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला.

राजकुमार बडजात्या यांनी करिअरची सुरुवात सहदिग्दर्शक म्हणून केली होती. हम साथ साथ है, हम प्यार तुम ही से कर बैठे, मैं प्रेम की दिवानी हूँ, विवाह, इसी लाईफ में आणि पिया का घर यासारखी अनेक गाजलेल्या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली.

हिंदी सिनेसृष्टीत योगदान

राजकुमार बडजात्या यांनी बॉलिवूडमध्ये योगदान दिलं. त्यांनी 2015 मध्ये प्रेम रतन धन पायो या सिनेमाची निर्मिती केली होती. 1999 मधील हम आपके हैं कोन, 1994 मधील मैंने प्यार किया यासारख्या सिनेमांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला त्यांनी मोठा स्टार बनवलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *