Vicky Kaushal: कँडल लाइट डिनर अन् बरंच काही.. विकी कौशलने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस

'शादीशुदावाला बर्थडे', अशी कमेंट विकीने (Vicky Kaushal) केली. 9 डिसेंबर 2021 रोजी विकी आणि कतरिना कैफने लग्नगाठ बांधली.

May 17, 2022 | 1:25 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 17, 2022 | 1:25 PM

सोमवारी (16 मे) अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला. विकी सध्या पत्नीसोबत न्यूयॉर्कमध्ये असून तिथेच त्याने कतरिना कैफ आणि मित्रांसोबत सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 5
विकीच्या वाढदिवसानिमित्त कतरिनाने खास रुफटॉप कँडल लाइट डिनरचं आयोजन केलं होतं. त्याची झलकही या फोटोंमध्ये पहायला मिळतेय.

2 / 5
वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडीओसुद्धा विकीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये कतरिना त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतेय.

3 / 5
आणखी एका फोटोत विकी आणि कतरिना त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत पहायला मिळत आहेत. 'तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्याकडूनही तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम', असं कॅप्शन विकीने या फोटोंना दिलं आहे.

4 / 5
विकी आणि कतरिना गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्येच आहेत. या ट्रिपचे काही फोटो त्यांनी याआधीही सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें