रक्त बंबाळ शरीर, जखमांच्या खुणा, कसं केलं विकी कौशलचं भयानक ट्रान्सफॉर्मेशन?
Chhaava: 'छावा' सिनेमा पाहताना आलं डोळ्यात पाणी, शेवटच्या सीनध्ये रक्त बंबाळ विकी..., शरीरावर जखमांच्या खुणा..., कसं केलं विकी कौशलचं भयानक ट्रान्सफॉर्मेशन? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा...

‘हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं।’ , ‘फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती, अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की भी जुर्रत की।’ असे एकापेक्षा एक डायलॉय आपल्या खास शैलीने मोठ्या पडद्यावर मांडत अभिनेता विकी कौशल याने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं आहे. सिनेमात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्याचा मोठ्या पडद्यावर प्रयत्न केला आणि अभिनेत्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याच्या अभिनयाची चर्चा रंगली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विकीचं अभिनय पाहण्यासारखं आहे. अभिनेत्याचं फक्त अभिनय नाही कर, शेवटच्या सीनमध्ये अभिनेत्याचा बदलेला लूक देखील चर्चेचा विषय ठरत आहे. गद्दारी केल्यानंतर महाराज शत्रूच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर औरंगजेबाने महाराजांचे नखं उपटून काढली, त्यांची जीभ कापली… असंख्य वेदना त्याने महाराजांना दिल्याचं सिनेमातील शेवटच्या सीनमध्ये दाखवण्यात आलं आहे.
सीन पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. पण लक्ष्मण उतेकर यांनी सीन कसा साकारला असेल? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉस्थेटिक आर्टिस्ट प्रीतिशील यांनी Da Make Up Lab ब्रँड विकी कौशल यांचं लूक बदलण्याचं काम केलं आहे.




रक्त बंबाळ शरीर, जखमांच्या खुणा असलेल्या विकी कौशलच्या सीनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सीनमध्ये अभिनेत्याला बांधलेलं आहे. विकी आणि अभिनेता विनीत कुमार सिंग एकमेकांसोबत कवितेत बोलताना दिसत आहेत. विनीत याने सिनेमात कवी कलश यांची भूमिका साकारली आहे.
सिनेमातील शेवटचा सीन तर चर्चेत आहेत, पण मेकअप आर्टिस्टचं देखील कौतुक होत आहे. सांगायचं झालं तर, विकी कौशल सोबतच अभिनेता अक्षय खन्ना यांच्या भूमिकेचं देखील कौतुक होत आहे. मेकअप मागे अक्षय खन्ना असल्याचं ओळखणं देखील कठीण आहे.
अक्षय खन्ना याने देखील दमदार अभिनय करत औरंगजेबाच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्याची भूमिका प्रचंड आवडली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर सिनेमा गडगंज कमाई करताना दिसत आहे.