विजय माल्ल्या याचे बॉलिवूड अभिनेत्रींसोबत होते खासगी संबंध? म्हणाला ‘त्यांना लोकप्रियता मिळाली कारण…’
Vijay Mallya on Bollywood Actress : कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आसलेला विजय माल्या गेल्या काही वर्षांपासून परदेशात राहत आहे... दरम्यान, त्याने बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं...

Vijay Mallya on Bollywood Actress : एक काळ असा होता जेव्हा फॅशन जगतात देखील विजय मल्ल्या पुढे होता. 2000 च्या दशकात किंगफिशर एयरलाइन्सने बहुचर्चीत किंगफिशर कॅलेंडर देखील लॉन्च केला होता. किंगफिशर कॅलेंडरला त्या काळात फार बोल्ड समजलं जात आहे. किंगफिशर कॅलेंडरमुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि करतरिना कैफ हिच्या करियराला देखील नवीन वळण मिळालं. दरम्यान, एका मुलाखतीत विजय माल्याने कॅलेंडरबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं… शिवाय अभिनेत्रीसोबत असलेल्या खासगी संबंधांबद्दल विजय याने मोठं वक्तव्य केलं.
विजय माल्या कॅलेडरबद्दल म्हणाला, ‘आम्ही योग्य मुलींची निवड केली.. कॅलेंडरमुळे दीपिका पादुकोण पासून कतरिना कैफ हिच्यापर्यंत अभिनेत्री एकारात्रीत स्टार झाल्या. ‘आमच्या कॅलेंडरला फार वर्ष देखील झाली नव्हती. पण सर्व अभिनेत्री आणि सेलिब्रिटी आमच्या कॅलेंडरवर होते. आम्ही योग्य चेहऱ्यांची निवड केली. योग्य मुली आम्ही कॅलेंडरसाठी निवडल्या. एक उत्तम मार्केटिंग टूल म्हणून मी असं केलं. याचा मला व्यक्तीगत कोणताच फायदा झाला नाही. या ब्रांडमुळे मोठं चमत्कार झाला.’
यावेळी विजय माल्या याला अभिनेत्रींसोबत असलेल्या खासगी संबंधांबद्दल देखील विचारलं. यावर विजय म्हणाला, ‘हे फक्त कॅलेंडरपर्यंत मर्यादित होतं…’ सांगायचं झालं तर, 2003 कतरिना कैफ किंगफिशर कॅलेंडर लॉन्च एडिशनचा भाग होती. तर दीपिका पादुकोण 2006 मध्ये किंगफिशर कैलेंडर लॉन्च एडिशनचा भाग होती.
विजय माल्या याच्या कॅलेंडरवर कतरिना कैफ, याना गुप्ता, दीपिका पादुको, ब्रुन अब्दल्लाह, नरगिस फाखरी, ईशा गुप्ता, लाझा हेडेन, सयामी खरे यांसारख्या अभिनेत्री कॅलेंडरवर झळकल्या होत्या. उद्योगपती विजय मल्ल्या याने त्याच्या किंगफिशर कॅलेंडरबद्दल आणि 2000 च्या दशकात जेव्हा किंगफिशर बंद झालं नव्हतं तेव्हा त्याचा बॉलिवूड कल्चरवर परिणाम झाला याबद्दल सांगितलं. मुलाखतीत विजय मल्याने अनेक खुलासे केले.
दीपिका आणि कतरिना यांयाच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज दोघी बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. कतरिना आणि दीपिका फक्त प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. दोघींना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दोघींनी आतापर्यंत अनेक सिनेमांंध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघी कायम सक्रिय असतात.
