AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पारू’च्या जोडीची आता पाकिस्तानात ‘स्पायगिरी’! भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन- मुग्धा कर्णिक

'पारू' या मालिकेतील अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर यांच्या भूमिका साकारलेले कलाकार विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक लवकरच एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याविषयी सविस्तर जाणून घ्या..

'पारू'च्या जोडीची आता पाकिस्तानात 'स्पायगिरी'! भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन- मुग्धा कर्णिक
Vijay Patwardhan and Mugdha KarnikImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 07, 2026 | 3:31 PM
Share

अनेक दशकं इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेतून ते ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकाद्वारे प्रथमच मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन संस्थांची ही निर्मिती आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक ही जोडी या नाटकाचं मुख्य आकर्षण आहे.

याविषयी अभिनेते विजय पटवर्धन म्हणतात, “कॅरी ऑन SPYगिरी हे माझं 58 वं व्यावसायिक नाटक. या नाटकातून मी आणि मुग्धा कर्णिक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत. मुळात मुग्धा आणि माझी गट्टी ‘घोळात घोळ’ या नाटकापासून जमली. आम्हाला एकमेकांच्या कामाच्या पद्धतीची आणि ‘टायमिंग’ची अचूक कल्पना असल्याने, ‘कॅरी ऑन SPYगिरी’ मध्येही प्रेक्षकांना आमची तीच सहज केमिस्ट्री पाहायला मिळेल. मालिका आणि नाटकात जमीन-अस्मानचा फरक असतो; नाटकाचा प्रेक्षक पूर्णपणे तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं हे नटाचं खरं कसब असतं. आजच्या टेन्शनने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. ‘कॅरी ऑन SPYगिरी’ नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट असून त्यांच्या ‘ब्लॅक ह्युमर’ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल.”

अभिनेत्री मुग्धा कर्णिक सांगताता, “मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस असून हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहे. विजय आणि मी ‘पारू’ मालिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र आहोत, ज्याचा फायदा नाटकाच्या तालमीतही होतोय. मात्र, मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी ‘पॅटर्न’ मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालं आहे. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील ‘राजकीय भाष्य’ नाटकाला एक वेगळीच उंची देतं. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे.”

या नाटकात मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 10 एप्रिल 2026 रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई इथं; तर 18 एप्रिल 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे इथं या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. अस्सल ‘दाभोळकरी’ शैलीतील हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.

Follow Us
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची.
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही.
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता...
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत.....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत......
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या.
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने.