Kareena Kapoor : जगा आणि जगू द्या.. प्रेग्नन्सीच्या अफवा उठताच करीनाची नणंद भडकली
करीना कपूरच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे तिच्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, तिच्या टीमने या अफवा फेटाळल्या. आता नणंदेनेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, केवळ एका अँगलवरून निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे म्हटलं आहे.

बॉलिवूडची ‘बेबो’अर्थात करीना कपूर खानला (Kareena Kapoor) सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच करीना तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे का असं म्हणत चर्चांना उधाण आलं. करीना ही नुकतीतच मुंबईत स्पॉट झाली होती, तेव्हा तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. मात्र त्या व्हिडीओचा एक अंगल पाहून सोशल मीडियावर करीनाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर धरला. जिकडे तिकडे तिच्या गरोदरपणाचीच चर्चा सुरू झाली. मात्र या फक्त अफवा असून यात काहीही सत्य नसल्याचं सांगत तिच्या टीमकडून या सगळ्या बातम्या फेटाळण्यात आल्या. यानंतर आता करीनाच्या नणंदेनेही या व्हायरल व्हिडीओवर रिॲक्शन दिल असून तिने तर एक पोस्टच शेअर केली आहे. सैफची बहीण आणि करीनाची नणंद सबा हिने करीनाच्या प्रेग्नन्सीच्या दाव्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
भडकली सबा अली खान
अभिनेता सैफ अली खान याची बहीण सबा हिने करीनाचा तो व्हिडीओ पोस्ट केला हे, ज्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवा फिरू लागल्या होत्या. मात्र ही पोस्ट शेअर करतानाच तिने वहिनी करीनाच्या गरोदरपणाचं वृत्त हे अफवाच असल्याचं स्पष्ट केलं. करीन गरोदर नाहीये हे स्पष्ट करतानाच, कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणतेही अंदाज लावू नका असं आवाहनही तिने लोकांना केलं.
लोक लगेच निष्कर्षापर्यंत कसे पोहोचतात?
चुकीच्या अँगलमधून काढलेला फोटो किंवा एखादी हेअरस्टाइल एखाद्या व्यक्तीचा लूक पूर्णपणे बदलू शकते त्यामुळे केवळ एका व्हिडिओच्या आधारावर कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबाबत निष्कर्ष काढणे योग्य नाही, असं सबा अली खान हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट सोबत लिहीलं आहे. करीना प्रेग्नंट नसल्याचे स्पष्ट करत सबा हिने मिश्कील अंदाजात पुढेमअसेही म्हटले की, मी स्वतः माझ्या बहिणीला दुसरं मूल होण्यासाठी पटवून देत आहे, पण ही गोष्ट कळली तर ती माझा जीव घेईल!

‘स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या’” असा संदेशहीतिने या पोस्टद्वारे दिला. तसेच प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि खासगीपणाचा आदर करावा, विनाकारण अंदाज बांधू नयेत, असंही तिने पुन्हा नमूद केलं.
नेमकं काय झालं?
अभिनेत्री करीना कपूर ही जिममधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर समोर आला. व्हिडिओमध्ये ती तिच्या कारकडे जाताना दिसत होती. यावेळी तिच्या टीममधील एक व्यक्ती छत्रीच्या मदतीने तिला कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. मात्र याच व्हिडिओतील एका अँगलमुळे सोशल मीडिया यूजर्सनी करीना यांच्या प्रेग्नन्सीबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात केली. 2012 साली करीनाने सैफशी लग्न केलं. 2016 साली तैमूर अली खान या मोठ्या मुलाचा तर 2021 मध्ये जहांगीर अली खान पटौदी या त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला.
