Video: मानेवर लव्ह बाईट अन् फुल्ल रोमान्स, विराट-जिनिलियाच्या वादग्रस्त जाहिरातीची चर्चा; नेमकं अॅडमध्ये काय होतं?
विराट कोहली आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूजा यांनी एका जाहिरातीत काम केले होते. मात्र, ही जाहिरात प्रदर्शित होताच रातोरात बॅन करण्यात आली. तुम्ही ही जाहिरात पाहिलीत का?

स्टार क्रिकेटर विराट कोहली एका मुलाखतीत म्हणाला होता की बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसुझावर त्याचे क्रश होते. पण शेवटी त्याचे लग्न अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत झाले. विराट आणि जिनिलियाची पहिली भेट एका जाहिरातीच्या सेटवर झाली होती. अनुष्कापूर्वी विराटने जिनिलिया डिसुझासोबत एका नामांकित ब्रँडसाठी अनेक जाहिराती केल्या होत्या. त्यातली एक अशी जाहिरात होती जी रिलीज होताच बॅन करावी लागली, पण ती जाहिरात आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे. या जाहिरातीमध्ये जिनिलिया विराटसोबत रोमॅन्स करताना दिसली होती. चला जाणून घेऊया ही जाहिरात काय होती आणि ती का बॅन झाली?
जिनिलिया आणि विराटची जाहिरात (Virat Kohli and Genelia D’Souza Controversial Ad)
खरे तर ही विराट-जिनिलियाची जाहिरात एका बॅग ब्रँडची होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की विराट आणि जिनिलिया दोघे विमानात आहेत. विराट पायलटच्या भूमिकेत आहेत, तर जिनिलिया फ्लाइट अटेंडंट म्हणजे एअर होस्टेसच्या रोलमध्ये दिसते. विराट पायलटचा युनिफॉर्म घालून को-पायलटसोबत कॉकपिटमध्ये बसलेला असतो आणि विमान उडवत असतो. जेव्हा को-पायलट वॉशरूमला जातो, तेव्हा एअर होस्टेस बनलेली जिनिलिया कॉकपिटमध्ये विराटजवळ येते आणि मग दोघांमध्ये रोमान्स सुरू होतो. या गोंधळात विमानातील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. जनहिताचा विचार करून ही जाहिरात बॅन करण्यात आली होती.
View this post on Instagram
लोकांची प्रतिक्रिया (Virat-Genelia Ad On a Plane)
ही जाहिरात एका रेडिट यूजरने नुकतीच शेअर केली आहे. एकाने लिहिले, “खूप बरोबर केलं हे जाहिरात बॅन करून, नाहीतर खूप काही बिघडलं असतं.” दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, “आधी रस्ते आणि रेल्वे अपघात होत होते, आता तर विमान अपघातही होऊ लागले.” तिसऱ्याने लिहिले, “प्रशासन बेजबाबदार होत चाललं आहे.”
जिनिलिया आणि विराटाच्या जाहिरातीविषयी
विराट आणि जिनिलियाची ही जाहिरात 2011मध्ये प्रदर्शित झाली होती. ही जाहिरात प्रदर्शित होताच अनेकांनी त्यावर टीका केली होती. त्यानंतर रातोरात ही जाहिरात बॅन करण्यात आली. त्यानंतर कधीही टेलिव्हीजनवर ही जाहिरात दिसली नाही. मात्र, युट्यूबवर ही जाहिरात आजही आहे. आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
