नशेत या प्रसिद्ध अभिनेत्याने तब्बूला बळजबरी किस करण्याचा केला प्रयत्न; पुन्हा कधीच सोबत केलं नाही काम
एका प्रसिद्ध अभिनेत्याने दारुच्या नशेत तब्बूला भर पार्टीत बळजबरी किस करण्याचा प्रयत्न केला. अखेर अभिनेते डॅनी यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बूच्या बहिणीने या प्रकरणावरून माध्यमांसमोर तक्रार केली. त्यानंतर तब्बूने कधीच त्या अभिनेत्यासोबत काम केलं नाही.

मनोरंजन श्रेत्रात स्कँडल्स आणि वादविवाद होतच असतात. कलाकारांमधील मतभेद, गुपचूप उरकलेली लग्न, विवाहबाह्य संबंध अशा असंख्य गॉसिप्स सेलिब्रिटींबद्दल होत असतात. असाच एक वाद आहे अभिनेत्री तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांचा. तब्बू ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंडस्ट्रीत अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं. मात्र तिने जॅकी श्रॉफसोबत कधीच काम न करण्याचं ठरवलं. यामागचं कारणही ततसंच आहे. जॅकी श्रॉफने एका पार्टीत तब्बूला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला होता.
ही घटना 1986 मध्ये घडली होती. त्यावेळी जॅकी श्रॉफ हे तब्बूची मोठी बहीण फराह नाझसोबत ‘दिलजला’ या चित्रपटात काम करत होते. यामध्ये तनुजा आणि डॅनी डेंझोपा यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाची टीम मॉरिशसला शूटिंगसाठी गेली होती. त्यावेळी फराहने तिच्या किशोरवयीन बहीण तब्बूलाही सोबत घेतलं होतं. शूटिंगनंतर डॅनीने एका पार्टीचं आयोजन केलं होतं आणि त्याच चित्रपटातील सर्व कलाकारांना आणि क्रू मेंबर्सना बोलावलं होतं. याच पार्टीत दारूच्या नशेत असलेल्या जॅकी श्रॉफ यांनी तब्बूला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. अखेर डॅनीने परिस्थिती हातताळली आणि जॅकीला तब्बूपासून दूर नेलं.




View this post on Instagram
पार्टीच्या रात्री डॅनीने जरी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी तब्बूच्या बहिणीने दुसऱ्या दिवशी त्यावरून मोठा वाद निर्माण केला. फराहने माध्यमांसमोर थेट जॅकी यांच्याबद्दल तक्रार केली. हे सर्व घडत असताना तब्बूने मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर हा सर्व गैरसमज असल्याचं म्हणत हे प्रकरण मिटवलं गेलं. मात्र तब्बूने तिच्या करिअरमध्ये कधीच जॅकी श्रॉफसोबत काम केलं नाही.
तब्बूने वयाच्या 11 व्या वर्षीच ‘बाजार’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंततर तिने वयाच्या 14 व्या वर्षी ‘हम नौजवान’ या चित्रपटात देव आनंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विजयपथ’ या चित्रपटामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. फक्त हिंदीतच नाही तर तब्बूने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘माचिस’ आणि ‘चांदनी बार’ या चित्रपटांमधील भूमिकांसाठी तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत.