सुशांत सिंह राजपूत कधीच निष्ठावंत नव्हता, तो मला सतत…, सारा अली खानचा खळबळजनक खुलासा
Sara Ali Khan: सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत सारा अली खानचं खास कनेक्शन, फार्महाऊसमध्ये दोघांनी एकत्र व्यतीत केलेले क्षण, मोठी माहिती समोर, सारा अली खानचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, 'सुशांत कधीच निष्ठावंत नव्हता, तो मला सतत.... '
अभिनेता सैफ अली खान याची लेक आणि अभिनेत्री सारा अली खान हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत बॉलिवूड करियरला सुरुवात केली. पहिल्याच सिनेमातून सारा, सुशांत याच्यासोबत दिसली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण अभिनेत्याच्या अचनाक निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.
सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात एनसीबीने सारा अली खान हिला चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हा अभिनेत्रीने मोठा खुलासा केला होता. रिपोर्टनुसार, सारा हिने सुशांत डेट करत असल्याचं सांगितलं होतं. पण अभिनेत्रीने त्यांच्या ब्रेकअपचं कारण देखील सांगितलं…
View this post on Instagram
सारा हिने दिलेल्या माहितीनुसार, नात्यामध्ये सुशांत कधीच निष्ठावंत नव्हता. सारा म्हणाली होती, ‘सुशांत प्रचंड पजेसिव होता. माझ्या आगामी सिनेमा सुशांतला कास्ट करा… असं दिग्दर्शकांना जाऊन सांग. असं तो सतत म्हणायचा…’ याचदरम्यान, सारा हिने ड्रग्स सेवनाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मी सिगारेट ओढली होती…’ अशी कबुली साराने चौकशीमध्ये दिली होती.
सुशांतबद्दल केयरटेकर दिलेली धक्कादायक माहिती
लोनावळा याठिकाणी सुशांत सिंह राजपूत याचा एक फार्महाऊस आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर फार्महाऊसच्या केअरटेकरने IANS ला महत्त्वाची माहिती दिली होती. केअरटेकरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता 2019 मध्ये सारा हिला प्रपोज देखील करणार होता. त्यासाठी सुशांत अभिनेत्रीला एक गिफ्ट देखील देणार होता.
View this post on Instagram
‘2018 पासून सारा कायम फार्महाऊसवर यायची. पण 2019 नंतर सारा कधीच आली नाही. पण सुशांत तर सारा हिच्यासोबत एका ट्रिपची प्लानिंग करत होता. पण ट्रिपनंतर रद्द देखील झाली. सुशांत जेव्हा सारा हिच्यासोबत फार्महाऊसवर यायचा तेव्हा दोघे 3 – 4 दिवस एकत्र राहायचे. थायलँडहून परतल्यानंतर देखील दोघे थेट फार्महाऊसवर आले होते.’ अशी माहिती देखील केअरटेकरने चौकशी दरम्यान दिली होती.