AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोलेचं शुटिंग झालेलं ते गाव नेमकं कुठे? आता एवढं सुंदर दिसतंय विरूचं रामगड

शोले चित्रपटामध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्च यांची मुख्य भूमिका आहे, शोले या चित्रपटाचं शुटिंग ज्या गावात करण्यात आलं होतं, ते रामगड आता कसं दिसतं? त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

शोलेचं शुटिंग झालेलं ते गाव नेमकं कुठे? आता एवढं सुंदर दिसतंय विरूचं रामगड
ramgadImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 03, 2025 | 6:16 PM
Share

बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. धर्मेंद्र यांनी शोले चित्रपटामध्ये भूमिका केली होती, ही भूमिका एवढी सुपरहीट ठरली की, त्यानंतर धर्मेंद्र यांना वीरू नावानेचं ओळखलं जाऊ लागलं. आता हा चित्रपट पुन्हा एकदा री-रिलीज होणार आहे, बारा डिसेंबर 2025 ला पुन्हा एकदा हा चित्रपट री-रिजील होणार आहे. मात्र जेव्हा -जेव्हा शोले चित्रपटाची चर्चा होते, तेव्हा शोले चित्रपट हा रामगडच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अनेकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता असते, की शोले चित्रपटातील रामगड हे गाव नेमकं कुठे आहे, आणि या गावात किती बदल झाला आहे, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. शोले चित्रपटातील रामगडचा सेट हा कर्नाटक येथील रामगनगर येथे लावण्यात आला होता.

रामनगरच्या ज्या टेकडीवर या चित्रपटाचं चित्रिकरण झालं होतं, त्या टेकडीला आज शोले हिल नावानं ओळखलं जातं. ही शोले हिल पहाण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे येत असतात. शोले हिलवर कायमच पर्यटकांची गर्दी असते. आता आपण जाणून घेणार आहोत, की चित्रपटाच्या वेळी हे रामगड कसं होतं, आणि आज त्यामध्ये किती बदल झाला आहे?, तेथील लोकसंख्या किती आहे? त्यावेळी हे रामगड कसं दिसत होतं? याबद्दल.

शोलेच्या रामगडची लोकसंख्या किती

एका रिपोर्टनुसार या गावाची लोकसंख्या जवळपास दहा लाखांच्या आसपास आहे. हा आकडा 2011 च्या जनगणनेनुसार घेतला गेलेला आहे. या गावात पुरुषांची संख्या 5,48,008 एवढी आहे, तर महिलांची संख्या 5,34,628 एवढी आहे. रामगडमध्ये सर्वाधिक हिंदू धर्माचे लोक वास्तव्याला आहेत, तर काही प्रमाणात मुस्लिम समाज देखील आहे. 2011 च्या जनगणनेनुसार येथील 88 टक्के लोक हे हिंदू आहेत, तर 10.56 लोक मुस्लिम आहेत. या गावाचा साक्षरता रेट हा 76.76 एवढा आहे.

शोले या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केलं आहे, त्यावरून रामनगरमध्ये जिथे हा चित्रपट तयार करण्यात आला, त्याला सिप्पी नगर असं नाव देण्यात आलं आहे. रामनगरला सिल्क सिटी असं देखील म्हटलं जातं, कारण भारतामधील सर्वात मोठी सिल्क इंडस्ट्री रामनगरमध्ये आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.