AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृण्मयी देशपांडेच्या ‘मनाचे श्लोक’ला इतका विरोध का? वादामागचं नेमकं कारण काय?

Manache Shlok : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या 'मनाचे श्लोक' या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या चित्रपटाचे शोज थिएटरमध्ये जाऊन बंद पाडण्यात आले आहेत. त्यानंतर मृण्मयीने मोठा निर्णय घेतला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय, ते सविस्तर वाचा..

मृण्मयी देशपांडेच्या 'मनाचे श्लोक'ला इतका विरोध का? वादामागचं नेमकं कारण काय?
Manache ShlokImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2025 | 10:39 AM
Share

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाचे शोज काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यासह विविध ठिकाणी गोंधळ घालून बंद पाडले. या पार्श्वभूमीवर मृण्मयी देशपांडेनं चित्रपटाचं प्रदर्शन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी 16 ऑक्टोबरपासून हा चित्रपट नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा तिने केली आहे. या चित्रपटावरून हा वाद का होत आहे आणि हिंदुत्ववादी संघटना या चित्रपटाला इतका विरोध का करत आहेत, ते समजून घेऊयात..

‘मनाचे श्लोक’ला विरोध का?

मृण्मयीने जरी तिच्या चित्रपटाचं नाव ‘मनाचे श्लोक’ असं दिलं असलं तरी याच नावाने समर्थ रामदारांनी अध्यात्मिक पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे चित्रपटाला असं नाव देऊ नये, असा मुद्दा मांडला जात आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात लिव्ह-इन रिलेशनशिपसारखा वादग्रस्त मुद्दा मांडण्यात आल्याचंही म्हटलं गेलंय. त्यामुळे अशा विषयाच्या चित्रपटाला ‘मनाचे श्लोक’ हे नाव देऊन लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात आहे. आज ‘मनाचे श्लोक’ असं नाव देऊन त्यात लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलची कथा दाखवली, उद्या ‘ज्ञानेश्वरी’ असं चित्रपटाचं नाव देत त्यात गौतमी पाटीलला नाचवतील, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक सुनील घनवट याविषयी म्हणाले, “शतकांपासून मनाचे श्लोक हे पुस्तक लाखो लोकांना धर्म, आत्म-शिस्त आणि भक्तीच्या मार्गावर मार्गदर्शन करथ आहे. या पूजनीय धर्मग्रंथाला नफा आणि मनोरंजनाचं साधन बनवणं अस्वीकार्य आहे. यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.”

चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं

‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी सज्जनगड इथल्या ‘समर्थ सेवा मंडळा’ने उच्च न्यायालयात केली होती. ती अमान्य झाल्यानंतर 10 ऑक्टोबरला चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्यात आला. मात्र पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी थिएटरमध्ये जाऊन आक्षेप घेतला आणि गोंधळ घालत शोज बंद पाडले. त्यानंर मृण्मयी देशपांडेनं चित्रपटाचं प्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी अनेक मराठी कलाकारांनी मृण्मयीला पाठिंबा दिला असून शोज बंद पाडणाऱ्यांचा तीव्र निषेध केला आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.