AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत अमेरिकेच्या गॅब्रिएलने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब?

खास प्रश्नाचं उत्तर देत अमेरिकेच्या गॅब्रिएलने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब; भारताच्या मिस युनिव्हर्स २०२१ हरनाज संधू हिने गॅब्रिएलला घातलं कोट्यवधींचं मुकूट

कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत अमेरिकेच्या गॅब्रिएलने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब?
कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत अमेरिकेच्या गॅब्रिएलने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब?
| Updated on: Jan 15, 2023 | 12:27 PM
Share

न्यू ऑर्लिन्स : अमेरिकेतल्या लुइजियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात 71 व्या ‘मिस युनिव्हर्स’ या सौंदर्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिविता रॉय मैदानात उतरीली होती. पण भारतीयांना निराश करणारी गोष्ट म्हणजे दिविता राय मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्वतःचं नाव नोंदवू शकली नाही आणि स्पर्धेतून बाहेर झाली. यंद्याच्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रिएल हिने जिंकला आहे.

तर जाणून घेवू कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर गॅब्रिएलने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब स्वतःच्या नावावर केला आहे. टॉप ३ स्पर्धकांना एक प्रश्न विचारण्यात आला. पण गॅब्रिएलने दिलेलं उत्तर परीक्षकांना प्रचंड आवडलं आणि ‘मिस युनिव्हर्स’चा किताब अमेरिकेने पटकावला. त्यानंतर भारताच्या मिस युनिव्हर्स २०२१ हरनाज संधू हिने गॅब्रिएलला मुकूट घातल्यानंतर विजेती भावुक झाली.

गॅब्रिएल हिला विचारण्यात आलेला प्रश्न ‘जर तुम्ही मिस युनिव्हर्स बनलात तर फॅशन इंडस्टी एक प्रगतिशील आणि सशक्त संस्था आहे, हे तुम्ही कशा प्रमाणाने दर्शवणार? या प्रश्नाचं दमदार उत्तर देत गॅब्रिएल हिने मिस युनिव्हर्स किताब स्वतःच्या नावावर केला. सध्या सर्वत्र मिस युनिव्हर्स २०२२ ची चर्चा रंगत आहे.

‘मला फॅशन इंडस्ट्रीला एक लिडर म्हणून ट्रॉन्सफॉर्म करायला आवडेल. फॅशन डिझायनिंगमध्ये १३ वर्ष काम केल्यानंतर फॅशनचा वापर योग्य पद्धतीने करण्याची माझी इच्छा आहे. मी फॅशनला माध्यम बनवून रिसायकल वस्तूंचा जास्त वापर करेल आणि प्रदूषण कमी करण्यासाठी माझा पाठिंबा असेल.

गॅब्रिएल पुढे म्हणाली, ‘मी माझे कपडे स्वतः डिझाइन करते. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना मी शिवणकाम शिकवते आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करते. मला इतरांसोबत पुढे जायचं आहे. आपल्या कौशल्याने समाजात बदल करण्याचं काम मला करायचं आहे. असं उत्तर गॅब्रिएल हिने दिलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.