AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यश भेटला नाही म्हणून चाहत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेवटी चिठ्ठीत जे काही लिहिलं ते…, खुद्द अभिनेत्याकडून मोठा खुलासा

अभिनेता यश याला भेटता आलं नाही म्हणून चाहत्यांने स्वतःला संपवलं. एवढंच नाही तर, त्याने शेवटच्या चिठ्ठीत असं काही लिहिलं जे थक्क करणार होतं. यावर खुद्द अभिनेत्याने मोठा खुलासा केला...

यश भेटला नाही म्हणून चाहत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेवटी चिठ्ठीत जे काही लिहिलं ते..., खुद्द अभिनेत्याकडून मोठा खुलासा
| Updated on: Aug 16, 2026 | 12:58 PM
Share

अभिनेता यश सध्या ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यश याची चर्चा रंगली आहे. केजीएफ सिनेमानंतर यश याच्या चाहत्यांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली. पण चाहत्यांची संख्या वाढल्यानंतर अभिनेत्याला मोठे निर्णय देखील घ्यावे लागले. सांगायचं झालं तर, यशची भेट झाली नाही म्हणून एका चाहत्यांने स्वतःचं आयुष्य संपवलं… त्यानंतर देखील अशा काही घटना घडल्या ज्यामुळे यश याने चाहत्यांना न भेटण्याचा निर्णय घेतला. ‘आप की अदालत’ या शोमध्ये अभिनेत्याने मोठा खुलासा केला.

यश याने वाढदिवशी आता सर्वांना भेटणं पूर्णपणे बंद केलं आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी अशी एक घटना घडली ज्यामुळे अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला. यश म्हणाला, ‘सुरुवातीला चाहत्यांना मी भोटायचो, पण लोकप्रियता वाढत गेल्यानंतर मोठ्या दुर्घटना घडू लागल्या. म्हणून मी चाहत्यांना भेटणं बंद केलं आहे. 2021 मध्ये मी वाढदिवशी घरीच नव्हतो. तेव्हा माझी फार जवळची व्यक्ती अभिनेते अंबरीश यांचं निधन झालं होतं. पण चाहत्यांना असं वाटलं की, मी घरात असून देखील त्यांना भेटलो नाही. वाढदिवशीच्या मी न भेटल्यामुळे एका चाहत्याने स्वतःला पेटवून घेतलं…’

‘त्याने आत्महत्या केल्यानंतर मला प्रचंड वाईट वाटलं. त्यानंतरच्या वाढदिवशी बॅनर लावताना एका चाहत्यांचा हात तुटला. तर अशाच घटनात आणखी तीन चाहत्यांचा मृत्यू झाला. अशा घटना घडत असल्याने मला आता खूप भीती वाटते. त्यामुळे मला असं वाटतं कोणी मला भेटलं नाही तरी चालेल. फक्त माझे सिनेमे पाहा… तेवढंच माझ्यासाठी तेवढं देखील पुरेसं आहे.’, असं देखील अभिनेत्याने सांगितलं आहे.

चाहत्याच्या सुसाईड नोटमध्ये यशचं नाव…

आत्महत्या केलेल्या चाहत्याने सुसाईड नोटमध्ये यश आणि तत्कालीन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित राहवं… अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र यश चाहत्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचला नाही. याचं कारण सांगत यश म्हणाला, ‘मी तिथे गेलो असतो तर, अनेकांना वाटलं असतं की, त्यांनीही असं पाऊल उचललं असतं तर, मी त्यांच्याही अंत्यसंस्काराला गेलो असतो… तिथे जाऊन मला काय मिळणार होतं? मला प्रचंड दुःख झालं होतं. पण मी असा देखील विचार केला की, तिकडे जाऊन मला काय मिळालं असते.’ असं देखील यश म्हणाला.

Follow Us
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?