Youtube Star Shanmukh Jaswanth : प्रसिद्ध यूट्यूब स्टारची दारुच्या नशेत तीन कारला धडक, पोलिसांकडून अटक

शनमुखने दारुच्या नशेत तीन गाड्यांना जोरदार धडक दिली आहे. (Youtube Star Shanmukh Jaswanth Arrest)

Youtube Star Shanmukh Jaswanth : प्रसिद्ध यूट्यूब स्टारची दारुच्या नशेत तीन कारला धडक, पोलिसांकडून अटक


हैदराबाद : प्रसिद्ध यूट्यूब स्टार, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि वेब सीरिज फेम शनमुख जसवंत याला पोलिसांनी अटक केली आहे. शनमुखने दारुच्या नशेत तीन गाड्यांना जोरदार धडक दिली आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला आहे. (Youtube Star Shanmukh Jaswanth Arrest Drunk And Drive Case)

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील ज्युबली हिल्स हा परिसर आहे. या परिसरात ही घटना घडली. शनमुख हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. त्यावेळी त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन वाहनांना धडक दिली. या धडकेमुळे त्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शनमुखला ताब्यात घेतले. यावेळी शनमुख दारुच्या नशेत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. सध्या पोलीस शनमुखची चौकशी करत आहेत. (Youtube Star Shanmukh Jaswanth Arrest Drunk And Drive Case)

कोण आहे शनमुख जसवंत?

  • शनमुख जसवंत याला शन्नू या नावाने फार प्रसिद्ध आहे.
  • शनमुख हा प्रसिद्ध युट्यूबर, डान्सर आणि अभिनेता आहे.
  • त्याचे स्वत:चे युट्यूब चॅनल आहे. त्यावर तो अनेक मजेशीर, कॉमेडी, संगीत, नृत्याचे व्हिडीओ अपलोड करतो.
  • त्याचे संपूर्ण भारतात मोठा चाहतावर्ग आहे.
  • शनमुखचा जन्म 16 सप्टेंबर 1994 रोजी झाला तो सध्या 26 वर्षाचा आहे.

संबंधित बातम्या : 

दोन लहान मुलं, तरीही पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, पतीचं क्रूर कृत्य, घरदार उद्ध्वस्त

आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर, रिटर्नमध्ये कांदे, बटाट्यांची पॅकिंग; फ्लिपकार्टच्या टीम लीडरचे कारनामे

घरातील कटकटींचा वैताग, आधी लोखंडी रॉडने पत्नीचा खून; नंतर मुलीचाही गळा दाबला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI