Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी

Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी

| Updated on: Sep 25, 2026 | 5:18 PM

पुणे आणि मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ गणपतीसह अनेक सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींना भक्तिमय वातावरणात निरोप दिला जात आहे. लाखो भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलले असून, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला जात आहे.

पुणे आणि मुंबईसह राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबईतील लालबाग परळ परिसर सध्या गणरायाच्या विसर्जनाच्या लगबगीने गजबजून गेला आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच गणेश गल्ली, चिंतामणी, तेजुकाया, परळचा राजा आणि रंगारी बदक चाळ येथील गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघाले आहेत. या भव्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी लाखो भाविकांनी मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी केली आहे.

दुसरीकडे, पुण्यातही भक्तिमय वातावरण आहे. पुण्यातील लाडका दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी निघाला असून, भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि आकर्षक देखाव्यांच्या साथीने बाप्पाची मिरवणूक काढली जात आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भाविकाचे अंतःकरण जड झाले आहे. जड अंतःकरणाने, डोळे पाणावलेल्या अवस्थेत भाविक बाप्पाला निरोप देत आहेत. संपूर्ण मुंबई आणि पुणे नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

Published on: Sep 25, 2026 5:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us