Lockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण

कोरोना संकटामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाऊन  (Lockdown 5 preparation by Modi government) आणखी वाढण्याचं चित्र आहे.

Lockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाऊन  (Lockdown 5 preparation by Modi government) आणखी वाढण्याचं चित्र आहे. कारण केंद्र सरकारने लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण केली आहे. 31 मे रोजी संपणारा चौथा लॉकडाऊन आता 1 जूनपासून पुन्हा वाढणार हे जवळपास निश्चित आहे. केंद्राच्या निर्देशानंतर राज्यात कडक संचारबंदी राहणार आहे. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी केवळ आवश्यक वस्तू सोडता, अन्य सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश तयार आहेत. (Lockdown 5 preparation by Modi government)

राज्यात रेड झोनमध्ये संचारबंदी आणखी कडक करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 जूनपासून पाचवा लॉकडाऊन सुरु होणार हे आता जवळपास निश्चित आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन 4 ( Lockdown 4) ची घोषणा केली होती. 18 मे ते 31 मेपर्यंत हा लॉकडाऊन होता.

गृहमंत्री अमित शाह यांनी काल अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. या चर्चेचा अहवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. मोदी आणि अमित शाह यांची आज बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

  • पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल
  • दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे
  • तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे
  • चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका

  • पहिली बैठक – 20 मार्च
  • दुसरी बैठक – 2 एप्रिल
  • दुसरी बैठक – 11 एप्रिल
  • तिसरी बैठक – 27 एप्रिल
  • पाचवी बैठक – 11 मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला. आता त्यानंतरही पुन्हा या लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत.

संबंधित बातम्या 

Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार   

PM Modi Live : संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा

Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *