Pawar Family | पार्थ पवारांची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा, सव्वा दोन तास सिल्वर ओकवर बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं (Parth Pawar Meet Sharad Pawar at Silver oak) आहे.

Pawar Family | पार्थ पवारांची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा, सव्वा दोन तास सिल्वर ओकवर बैठक
Follow us
| Updated on: Aug 13, 2020 | 10:17 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती. या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यानंतर पार्थ पवार हे शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास सव्वा दोन तास शरद पवार, सुप्रिया सुळे यांची पार्थ पवारांशी चर्चा सुरु होती. त्यानंतर पार्थ पवार सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले. या चर्चेत नेमकं काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. (Parth Pawar Meet Sharad Pawar at Silver oak)

भेटीनंतर चित्र बदलेल?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर पवार कुटुंबात वाद असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पार्थ पवार राम मंदिर आणि सुशांत प्रकरणाबाबत घेतलेल्या भूमिकांवर शरद पवारांकडे माफी मागू शकतात किंवा ते बंड पुकारु शकतात.

दरम्यान, भेटीतून, समोपचारातून प्रकरण थांबावं, असे प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या भेटीनंतर पार्थ पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

सुप्रिया सुळेंची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रावादीच्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. काल संध्याकाळी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्याचबरोबर आज सुप्रिया सुळे यांनी वायसीएमआर प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवाळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही” (Parth Pawar Meet Sharad Pawar at Silver oak)

पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.

पहिली भूमिका

पार्थ पवार यांनी 27 जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे, असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले होते.

दुसरी भूमिका

“आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. मात्र त्यानंतर पार्थ पवारांनी भूमिपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’चा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

पार्थ पवार यांचा परिचय

पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता. (Parth Pawar Meet Sharad Pawar at Silver oak)

संंबंधित बातम्या : 

नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला

पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

अजितदादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख, त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार : जयंत पाटील

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.