AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु

तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं. (Pune Tulsi Baug to reopen from 1st June)

पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु
| Updated on: May 29, 2020 | 2:52 PM
Share

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट एक जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग पूर्ववत सुरु होत आहे. महिला आणि तरुणाईची खरेदीसाठी झुंबड उडणारी तुळशीबाग ‘कोरोना’ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळपास अडीच महिने बंद होती. (Pune Tulsi Baug to reopen from 1st June)

तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं. सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून मार्केट सुरु करण्याची हमी संघटनेने दिली होती.

तुळशीबागेतील दुकानदार व कामगारांनी दुकानांची साफसफाई सुरु केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 16 ते 18 मार्च या कालावधीत तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला होता. त्यानंतर राज्यात संचारबंदी आणि केंद्राने लॉकडाऊन जरी केला. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून तुळशीबाग बंद होती.

हेही वाचा : पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 7012 वर

पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात सुमारे 300 दुकाने आहेत. एक दिवसाआड एक दुकान सुरु करण्याचा व्यापाऱ्यांचा विचार आहे. दुकाने सुरु करताना तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.

खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्राहकांचे तापमान तपासले जाईल, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने दिली.

दरम्यान, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईसुद्धा एक तारखेपासून सुरु होणार आहे. यामुळे पुणेकरांची भाजीपाल्याची समस्या मिटणार आहे. (Pune Tulsi Baug to reopen from 1st June)

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.