निलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर

" भाजपचे आउटडेटेड झालेले नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी आज मोठा जावई शोध लावला आहे", अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. ( Shivsena MP Vinayak Raut criticize Nilesh Rane)

निलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर

मुंबई – शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणेंनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत.  “भाजपचे आउटडेटेड झालेले नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी आज मोठा जावई शोध लावला आहे”, अशी टीका खासदार राऊत यांनी केली. ( Shivsena MP Vinayak Raut criticize Nilesh Rane)

“नाणार रिफायनरी प्रकल्पामध्ये देशमुख नावाच्या गृहस्थाने 1400 एकर जमीन घेतली आहे. हे देशमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत”, असा बेछूट व पोरकटपणाचा आरोप निलेश राणे यांनी केल्याची टीका विनायक राऊत यांनी केली.

“नाणार रिफायनरीच्या कंपनीच्या संदर्भातील बैठका मंत्रालय आणि वर्षावर होतात, असे बेताल वक्तव्य निलेश राणेंनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याल आम्ही कवडीची किंमत देत नाही. ते अभ्यास करुन बोलत नाहीत”, असेही विनायक राऊत म्हणाले.

स्थानिक जनतेच्या मागणीनुसार नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. नाणारमध्ये रिफायनरी होणार नाही, कारण उद्धव ठाकरेंनी स्थानिक जनतेला  दिलेला शब्द म्हणजेच वचन असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचे नातेवाईक निशाण देशमुख यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाधित भागात 1400 एकर जमीन विकत घेतली”, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. (Nilesh Rane allegations on Shivsena). निशाण देशमुख हे उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत, असा दावा निलेश राणे यांनी केलेला.

संबधित बातम्या:

‘नाणार’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा

‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर

( Shivsena MP Vinayak Raut criticize Nilesh Rane)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *