AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन पद्धतीचे हे ‘क्वालिटेटिव्ह’ सोल्युशन हेपटायटिस बी विषाणूच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रचलित आणि सुधारित चाचणी पद्धतीला पाठबळ देणार…

नवी दिल्लीतील आयएलबीएस येथील क्लिनिकल व्हायरोलॉजी विभागाच्या प्रभावी प्रा. डॉ. एकता गुप्ता म्हणाल्या, “हेपटायटिस बी चा देशावरील भार लक्षणीय आहे, मात्र भारतात या आजाराच्या निदानाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने आपण प्रत्यक्ष स्थितीबद्दल अनभिज्ञ आहोत. तपासणीची ही नवी पद्धत आजाराचे लवकर निदान होण्यास मदत करतेच, पण त्याचबरोबर हा विषाणू निदानाविना दुर्लक्षित राहण्याचा धोकाही कमी करते.

नवीन पद्धतीचे हे ‘क्वालिटेटिव्ह’ सोल्युशन हेपटायटिस बी विषाणूच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रचलित आणि सुधारित चाचणी पद्धतीला पाठबळ देणार...
Image Credit source: istockphoto.com
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : आरोग्यसेवा (Health) क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅबॉटने हेपटायटिस बी विषाणू (HBVV)चे अधिक चांगले निदान करण्यासाठी भारतात HBsAG हे नवे क्वालिटेटिव्ह सोल्युशन आणल्याची घोषणा केली आहे. तपासणीच्या या पद्धतीमुळे रुग्णांवर अधिक चांगले उपचार होण्यास मदत होईल व त्याचवेळी रक्ताचा पुरवठा सुरक्षित पद्धतीने सुरू राहील. ही अत्यंत संवेदनक्षम chemiluminescent microparticle immunoassay (CMIA) मानवी सीरम आणि प्लाझ्मामधील तसेच पॉप्युलेशन स्क्रिनिंगमधून एचबीव्‍हीचे लवकर आणि अधिक चांगल्या पद्धतीने निदान होण्यास मदत करते. केमिल्युमिनेसन्ट इम्युनोअसे हा नेहमीच्या प्रमाण एन्झाइम इम्युनोअसे या रोगप्रतिकारशास्त्रामध्ये वापरल्या जाणा-या जैवरासायनिक तंत्राचा एक नवा प्रकार आहे.

एचबीव्‍ही संसर्ग

एचबीव्‍ही संसर्गाचे निदान लवकरात लवकर झाल्यास रुग्णाला त्यातून उद्भवू शकणा-या यकृताच्या गंभीर आजाराला प्रतिबंध करणे किंवा असा आजार वेगाने बळावू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेता येते. इतकेच नव्हे तर यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो. HBsAg Next Qualitative assay ही एक प्रगत आणि नव्या युगाची उपाययोजना आहे, जी एचबीव्‍हीचे निदान लवकर व्हावे यासाठी पाठबळ पुरवते. या पद्धतीमध्ये मानवी सीरम आणि प्लाझ्मामधील एचबीव्‍ही अँटिजेनचे (HBsAG) निदान होते. शिवाय रोगप्रतिकारशक्तीमध्ये बिघाड झाल्याने उद्भवणा-या आजारांच्या गटातील संसर्गाचे निदान करण्यासाठी आवश्यक असणा-या मूल्यमापनाची सर्वोच्च पातळी या चाचणीमध्ये गाठली जात असल्यामुळे अशा तपासणीमध्ये पूर्वीपासून येत असलेल्या काही अडचणींवरही या तपासणी पद्धतीने मात केली आहे.

डॉ. जगनाथन सिकन म्हणाले की…

अॅबॉटच्या मेडिकल अफेअर्स, कोअर डायग्नोस्टिक विभागाचे सीनिअर असोसिएट डिरेक्टर डॉ. जगनाथन सिकन म्हणाले, “भारतामध्ये हेपटायटिस बी या आजाराची तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण हा आजार मोठ्या प्रमाणात निदानाविना दुर्लक्षित राहून जातो. HBsAg Next Qualitative assay मुळे आता भारतातील लॅबोरेटरीजना एचबीव्‍हीच्या संसर्गाचे निदान कधी नव्हे इतक्या लवकर करता येईल. यामुळे डॉक्टर्स या संसर्गाच रुग्णाला असलेला धोका लवकर ओळखू शकतील व त्यामुळे रुग्णाला लवकरात लवकर उपचार आणि देखभाल यांचा फायदा मिळू शकेल. ही असे अर्थात तपासणी पद्धती म्हणजे एचबीव्‍ही निदानपद्धतीची नवीनतम आवृत्ती आहे व त्यामुळे संसर्गजन्य आजारगटातील आमच्या सर्वंकष तपासणीसंचाला आणखी प्रगत स्वरूप प्राप्त होणार आहे.”

यकृताचा आजार

हेपटायटिस बी हा हेपटायटिस बी विषाणूमुळे होणारा एक यकृताचा आजार आहे. हा आजार तीव्र किंवा दुर्धर स्वरूपाचा असू शकतो, ज्यातील तीव्र आजाराच्या रुग्णांमध्ये यकृत निकामी होणे, यकृताला सूज येणे किंवा यकृताचा कर्करोग अशा गंभीर गुंतागुंती उद्भवण्याची शक्यता असते. जगभरातील सुमारे 20 कोटी 96 लाख लोक सध्या दुर्धर स्वरूपाच्या हेपटायटिस बी सह जगत आहेत आणि एचबीव्‍ही विषाणूच्या जगभरातील एकूण वाहकांपैकी 10 ते 15 टक्‍के लोक हे केवळ भारतात सापडतात. इतकेच नव्हे तर एचआयव्‍हीमुळे होणा-या या आजाराच्या संसर्गाचे प्रमाणही इथे अधिक आढळून येते. एचआयव्‍हीची लागण झालेल्या प्रत्येक दहा व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हेपटायटिस बीचा संसर्ग होतो असा अंदाज आहे.

आजाराचे निदान लवकर होणे गरजेचे

नवी दिल्लीतील आयएलबीएस येथील क्लिनिकल व्हायरोलॉजी विभागाच्या प्रभावी प्रा. डॉ. एकता गुप्ता म्हणाल्या, “हेपटायटिस बी चा देशावरील भार लक्षणीय आहे, मात्र भारतात या आजाराच्या निदानाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने आपण प्रत्यक्ष स्थितीबद्दल अनभिज्ञ आहोत. तपासणीची ही नवी पद्धत आजाराचे लवकर निदान होण्यास मदत करतेच, पण त्याचबरोबर हा विषाणू निदानाविना दुर्लक्षित राहण्याचा धोकाही कमी करते. इतकी उच्च संवेदनक्षमता असलेल्या दर्जात्मक निदान पद्धतीमुळे डॉक्टरांना या आजाराचा धोका असलेल्या रुग्णांना ओळखता येईल आणि त्यांना योग्य ते उपचार अधिक लवकर देता येतील.”

संसर्ग झाल्यापासून ते लक्षणे दिसेपर्यंत वेळ जातो

सीएमसी वेल्लोरच्या डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल व्हायरोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. जॉन फ्लेचर म्हणाले, “ HBsAg ची तपासणी करण्याप्रती बांधिलकी सीएमसीने 1970 च्या दशकापासूनची जपली आहे आणि आजही आम्ही या संदर्भात नव्या अद्ययावत तंत्रज्ञानांचा आणि रासायनिक उपाययोजनांचा स्वीकार करत आहोत. एचबीव्‍हीची खूण पटण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. उदाहरणार्थ संसर्ग झाल्यापासून ते लक्षणे दिसून येईपर्यंतच्या काळात विषाणूचे निदान न होणे, म्युटन्ट्स ओळखणे, गूढ स्वरूपाचे संसर्ग, ब्रेकथ्रू इन्फेक्शन्स आणि विषाणू पुन्हा सक्रिय होणे यांसारख्या अनेक अडचणी येतात.”

जागतिक आरोग्य संघटना उचलणार मोठे पाऊले

जागतिक आरोग्य परिषदेने संसर्गाच्या घटना आणि त्यातून उद्भवणा-या गुंतागुंती कमी व्हाव्यात यासाठी वर्ष 2030 पर्यंत सार्वजनिक आरोग्याशी निगडित समस्या असलेल्या विषाणूजन्य काविळीचा समूळ नायनाट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. आजाराचे लवकरात लवकर आणि अचूक निदान करणा-या परिणामकारक निदानपद्धतींची हे लक्ष्य गाठण्याच्या कामी मदत होऊ शकेल. HBsAg Next assay आपल्या सुधारित संवेदनक्षमता आणि विशिष्टतेदवारे भारताला एचबीव्‍ही निदान आणि देखभालीची उद्दीष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने आगेकूच करण्यास मदत करू शकेल.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....