Heaalthy Body: दररोज दुधामध्ये ‘हे’ पदार्थ मिसळून प्या, संसर्गाचे आजार होतील दूर….
benefits of adding this ingredients in milk: दुध तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. दुधाचं दररोज सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधित सर्व समस्या दूर होतात त्यासोबतच तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते. दुधामध्ये काही विशेष पदार्थाचा समावेश केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात

बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. हवामानातील बदलामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होऊ शकतात. संसर्गाचे आजार होऊ नये त्यासाठी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दुध पिणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी सारखे आवश्यक पोषक घटक आधीच असतात, परंतु तुम्ही काही गोष्टी जोडून त्याची ताकद वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या केवळ दुधाची चव वाढवतातच, शिवाय त्याची ताकद आणि पोषक तत्वेही अनेक पटींनी वाढवतात.
आहार तज्ञांच्यानुसार, दररोज दुधाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारामध्ये दुधाचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. तज्ञांच्या मते दुधामुळे तुमच्या शरीरातील उर्जा वाढते ज्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाता. माहितीनुसार, दुधामध्ये स्वयंपाकघरातील काही पदार्थ मिसळून खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया तज्ञांच्या मते कोणत्या पदार्थांचे दुधासोबत सेवन करावे.
- बदाम – बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात जे शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आहेत. बदाम हृदयाच्या आरोग्यास मदत करतात, निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात आणि तुमच्या त्वचेला आतून पोषण देऊन चमकदार ठेवण्यास मदत करतात.
- हळद- हळद तिच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखली जाते आणि हा सोनेरी मसाला दुधात मिसळून प्यायल्याने त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. हळदीमध्ये कर्फ्यूमिन नावाचे एक शक्तिशाली संयुग आढळते. हे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते
- मध- मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. उर्जेची पातळी वाढवण्यासाठी मध खूप फायदेशीर मानले जाते. तुम्ही ते रिफाइंड साखरेऐवजी वापरू शकता.
- दालचिनी- दालचिनी केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात दाहक-विरोधी, सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आहेत आणि ते व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, प्रथिने आणि अनेक आवश्यक खनिजांनी समृद्ध आहे.
- आले- त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, जस्त, तांबे, मँगनीज आणि क्रोमियम असे अनेक पोषक घटक असतात. चहापासून ते पदार्थ बनवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. सर्दी आणि खोकल्यासाठीही आल्याचा वापर केला जातो. याशिवाय, ते वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरावर चांगला परिणाम करतात.
- चिया सिड्स- चिया सिड्सना सुपरफूड मानले जाते. वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. चिया सिड्स हे खूप लहान काळे दाणे असतात जे पाण्यात टाकल्यानंतर लगेचच फुगतात. चिया सिड्समध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात, ज्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी एक आदर्श अन्न बनते.
