अँटी-बायोटिक्सच्या अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका, या गोष्टी ठेवा लक्षात

जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 7 लाख लोक एएमआरमुळे (Antimicrobial resistance ) जीव गमावतात आणि 2050 सालापर्यंत हा आकडा 1 कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अँटी-बायोटिक्सच्या अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका, या गोष्टी ठेवा लक्षात
अँटी-बायोटिक्सच्या अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका, या गोष्टी ठेवा लक्षातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 3:12 PM

नवी दिल्ली: अँटी-बायोटिक औषधांचे युग सुरू होण्यापूर्वी, संसर्गजन्य जीवाणूंमुळे रोग आणि साथीच्या रोगांची महामारी (Epidemics and Pandemics) यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. रोगांवर उपचार (treatment) करण्यासाठी अँटी-बायोटिक्सची सुरूवात ही 20 व्या शतकातील वैद्यकीय शास्त्रातील सर्वात मोठी प्रगती होती. लोकांना इजा न करता शरीरातील बॅक्टेरिया (bacteria) नष्ट करण्यास ही औषधे सक्षम आहेत.

त्यानंतर पुढच्या तीन दशकांत वैद्यकीय क्षेत्रात खूप विकास झाला आणि सूक्ष्म असलेल्या बॅक्टेरिआचा सामना करण्यासाठी अनेक शोध लागले. मात्र त्यानंतर मोठी घसरण झाली आणि शेवटी शोध घेऊनही काही निष्पन्न झाले नाही. पण शोध लागल्यापासून या अँटी-बायोटिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अँटी-बायोटिक औषधांचा अतिवापर आणि दुरूपयोग यामुळे विशेषत: बॅक्टेरिआंमध्ये Antimicrobial resistance (AMR) म्हणजेच अँटी-बायोटिक्सना प्रतिकार करण्याची क्षमता झपाट्याने वाढत आहे.

हे सुद्धा वाचा

अँटी-बायोटिक्समुळे होते मोठे नुकसान

व्हायरस ज्या प्रकारे पसरतो आणि विभागला जातो, अशा परिस्थितीत, म्यूटेशन होत असते. त्यापैकी बहुतेक वेळेस म्यूटेशन दरम्यान व्हायरसमध्ये फारसा बदल होत नाही. मात्र अँटी-बायोटिक्सचा जास्त वापरामुळे असे म्यूटेशन होते.

ज्यामुळे औषधांचा परिणाम होत नाही आणि रुग्णाचा आजार, त्रास बरा होत नाही. यामुळे केवळ मृत्यूदरच वाढत नाही तर जास्त पॉवर असलेले अँटी-बायोटिकसह रुग्णालयात राहण्याचा कालावधी व खर्च दोन्ही वाढतो.

जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 7 लाख लोक एएमआरमुळे (Antimicrobial resistance ) आपला जीव गमावतात आणि 2050 सालापर्यंत हा आकडा 1 कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केवळ एएमआरमुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या कॅन्सर आणि रस्ते अपघातात जीव गमावलेल्या लोकांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहे. भारतातही अशीच परिस्थिती आहे.

चुकीच्या अँटी-बायोटिक्सचे सेवन करू नका

व्हायर इन्फेक्शन झाल्यावर बहुसंख्य लोकांनी अँटी-बायोटिक औषधांचे सेवन केले आहे. अँटी-बायोटिक्सचा परिणाम बॅक्टेरिआवर होतो, पण व्हायरसवर नव्हे हे कोणाच्याही लक्षात येतत नाही किंवा मग लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. भारतात केमिस्टच्या सल्ल्यानुसार, औषधे विकत घेणे ही सामान्य गोष्ट आहे.

चुकीच्या अँटी-बायोटिक्सची निवड करणे, चुकीचे अन्न सेवन करणे आणि (आजारातून) बरे झाल्यानंतरही उपचार घेत राहणे, हे आपल्या देशात सुपरबग्स वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. या प्रकरणांमध्ये डॉक्टरही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत, हे दुर्दैवी आहे.

कल्चर रिपोर्ट न पाहता ते अँटी-बायोटिक्सचा वापर करत आहेत. काही प्ररिस्थितीमध्ये रुग्णाची स्थिती समजून न घेता औषधांचा डोस वाढवला जातो आणि काही ठिकाणी तर हलकासा संसर्ग असला तरी अँटी-बायोटिक्स दिली जातात.

अँटी-बायोटिक प्रतिकारापासून संरक्षण करण्यासाठी काय करू शकतो

1) अँटी-बायोटिक्सची खरोखर गरज आहे का ते सर्वप्रथम चेक करा. खरंतर ताप आणि सर्दी-खोकल्याची 90 टक्के प्रकरणे हे व्हायरलमुळे होतात, जे आपोआप बरे होतात.

2) अँटी-बायोटिक्सचा डोस योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. त्याशिवाय डॉक्टरांनी सांगितलेला औषधांचा कोर्स पूर्ण करावा.

3) शक्य असल्यास कल्चर आणि औषधांची सेन्सिटिव्हिटी टेस्ट करण्यावर भर द्या.

4) हातांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.