AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy life: उन्हाळ्यात उष्मघाताच्या समस्यांपासून वाचण्यासाठी या ड्रिंकचे सेवन ठरेल फायदेशीर

avoid these mistakes while drinking lemon water : उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. हे केवळ एक ताजेतवाने पेय नाही तर ते पिण्याचे अनेक फायदे आहेत. तथापि, अनेकांना ते योग्यरित्या कसे बनवायचे हे माहित नसते, ज्यामुळे तुमचे आरोग्य देखील बिघडू शकते. म्हणून, लिंबूपाणी बनवताना कोणत्या गोष्टी वापरू नयेत हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.

Healthy life: उन्हाळ्यात उष्मघाताच्या समस्यांपासून वाचण्यासाठी या ड्रिंकचे सेवन ठरेल फायदेशीर
लिंबूपाणीImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 06, 2025 | 12:26 PM
Share

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यामध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात तुमच्या शरीरामधील पाण्याची मात्रा कमी होते ज्यामुळे चक्कर येणे आणि उष्मधाताच्या समस्या होतात. या सर्व समस्या होऊ नये यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज दिवसभरातून 7-8 लिटर पाणी पिण्याची गरज असते. असे केल्यामुळे तुमच्या शरीरामधील पाण्याची मात्रा निरोगी राहाते. त्यासोबतच तुमच्या शरीरामधील हार्मेन्सचे संतुलन निरोगी राहाण्यास मदत होते. उन्हाळ्यात अेकजण लिंबू पाणी पिण्यास पसंती देते. उन्हाळा सुरू होताच, बहुतेक घरांमध्ये लिंबूपाणी बनवायला सुरुवात होते.

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायाल्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतेच आणि तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता देखील दूर करते. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिल्याने खूप आराम मिळतो. घशाला ओलावा देण्याव्यतिरिक्त, ते शरीराला थंड करते आणि आतून ऊर्जा प्रदान करते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. नियमित लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला निरोगी राहाण्यास आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत करते.

अनेकांना लिंबू पाणी योग्य प्रकारे कसे बनवायचे हे माहित नसते, ज्यामुळे अनेकांचे आरोग्य देखील बिघडते. अशा परिस्थितीत, लिंबू पाणी योग्य प्रकारे कसे बनवायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. या क्रमात, लिंबूपाणी बनवताना लोक अनेकदा करतात अशा 5 चुका येथे आहेत. बाजारातून आणलेले लिंबू न धुता थेट कापले तर त्यावरील धूळ आणि कीटकनाशके त्यांच्या आत शोषली जातात. यामुळे पोट बिघडू शकते किंवा अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. लिंबू पाण्याने चांगले धुवावे आणि शक्य असल्यास कोमट पाणी वापरावे. कधीकधी लोक सकाळी कापलेले लिंबू फ्रिजमध्ये ठेवतात आणि संध्याकाळी तेच वापरतात. पण हे करणे योग्य नाही. कापलेल्या लिंबूमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात, ज्यामुळे लिंबू पाणी पिल्यानंतर गॅस, उलट्या किंवा जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात. लिंबू पाणी संतुलित असेल तरच ते आरोग्यदायी असते. जास्त साखर टाकल्याने ते एका प्रकारच्या सरबतमध्ये बदलते, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्याच वेळी, जास्त मीठ टाकल्याने रक्तदाब वाढू शकतो. म्हणून, ते चवीनुसार घाला, कमी किंवा जास्तही नाही. लोक अनेकदा लिंबूपाणी बाटलीत साठवतात, परंतु जर बाटली किंवा काच व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर त्यात असलेले बॅक्टेरिया लिंबूपाणी खराब करू शकतात. यामुळे पोटदुखी किंवा अ‍ॅसिडिटी होऊ शकते. जर लिंबूपाणी बनवून काही तास बाहेर टेबलावर ठेवले तर त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात, विशेषतः उन्हाळ्यात. यामुळे, लिंबू पाणी आंबट होऊ शकते आणि ते पिल्याने तुम्ही आजारी पडू शकता. नेहमी ताजे बनवा किंवा फ्रिजमध्ये ठेवा.

लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे 

लिंबू पाणी पचन सुधारण्यास मदत करते आणि गॅसेसची समस्या कमी करते.

लिंबू पाण्याचे सेवन केल्याने भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

लिंबू पाण्याचे सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.

लिंबू पाणी त्वचेतील कोलेजन वाढवते आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते. नियमित लिंबू पाणी पिण्याने शरीर हायड्रेटेड राहते.

लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि आजारांशी लढण्यास मदत होते.

लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, कारण ते पचन सुधारते आणि अतिरिक्त कॅलरीज जाळण्यास मदत करते.

लिंबू पाणी त्वचेतील कोलेजन वाढवते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते.

लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि आजारांशी लढण्यास मदत होते.

लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.