AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : आधी मोठं अपयश पण मुलाच्या जन्मानंतर अमिताभ यांचं करिअर सुसाट सटलं, त्यांनी कधी मागे वळून बघितलच नाही

Amitabh Bachchan Career : अभिषेक बच्चनचा जन्म होण्याच्या चार महिने आधी अमिताभ बच्चन यांना करिअरमध्ये फटका बसला होता. एक मोठा चित्रपट फ्लॉप झालेला. पण मुलाच्या जन्मानंतर अमिताभ यांना कधी करिअरमध्ये मागे वळून बघावचं लागलं नाही.

Amitabh Bachchan : आधी मोठं अपयश पण मुलाच्या जन्मानंतर अमिताभ यांचं करिअर सुसाट सटलं, त्यांनी कधी मागे वळून बघितलच नाही
Amitabh Bachchan - Abhishek Bachchan
| Updated on: Jun 17, 2026 | 9:24 AM
Share

Amitabh Bachchan Career : अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचं महानायक म्हटलं जातं. कारण त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिलेत. ते चित्रपट, त्यांच्या भूमिका प्रेक्षक कधीच विसरु शकत नाहीत. पण त्यांच्या करिअरमध्ये अशीही एक वेळ आलेली जेव्हा एका चित्रपटाच्या अपयशाने त्यांच्या स्टारडमवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की, या चित्रपटाच्या अपयशानंतर चार महिन्यांनी अभिषेकचा जन्म झाला. त्यानंतर अमिताभच्या करिअरने असा वेग पकडला की, त्यांनी हिट चित्रपटांची रांगच लावली.

वर्ष 1975 अमिताभ यांच्या करिअरसाठी खूप खास ठरलं. ‘दीवार’, ‘शोले’ आणि ‘चुपके चुपके’ सारख्या चित्रपटांनी अमिताभ यांना इंडस्ट्रीतील सर्वात मोठं स्टार बनवलं. त्याचवर्षी आलेला त्यांचा ‘फरार’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नव्हता. 11 नोव्हेंबर 1975 साली रिलीज झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपट गृहापर्यंत खेचून आणू शकला नाही. अमिताभच्या करिअरमधील हा एक कमजोर चित्रपट मानला जातो. या फिल्मला डिजास्टरचा टॅग मिळाला.

त्यानंतर अमिताभ यांनी कधी मागे वळून बघितलं नाही

पण त्यांच्या नशिबात काही वेगळच होतं. 5 फेब्रुवारी 1976 रोजी अमिताभ आणि जया बच्चन यांच्या घरी अभिषेक बच्चनचं आगमन झालं. मुलगा झाल्याचा आनंद कुटुंबात होताच. पण अमिताभ यांच्या करिअरने सुद्धा एक नवीन झेप घेतली. अभिषेकच्या जन्मानंतर काही आठवड्यांनी 27 फेब्रुवारी 1976 रोजी अमिताभ यांचा ‘कभी कभी’ चित्रपट रिलीज झाला. यश चोपडा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा मल्टीस्टारर चित्रपट हिट ठरला. प्रेक्षकांचं भरपूर प्रेम या चित्रपटाला मिळालं. या वर्षात अमिताभने अनेक हिट चित्रपट दिले. त्यानंतर अमिताभ यांनी कधी मागे वळून बघितलं नाही.

ते सुपरस्टारवरुन मेगास्टार बनले

‘कभी कभी’ नंतर अमिताभ बच्चन यांचे हेरा फेरी, दो अनजाने, अदालत हे चित्रपट रिलीज झाले. तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमालीच परफॉर्म केलं. अमिताभच्या चित्रपटांनी फक्त चांगल परफॉर्मच केलं नाही, तर बरेच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. 1977 साली आलेला ‘अमर अकबर एंथनी’, ‘परवरिश’ आणइ ‘खून पसीना’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. 1978 साली आलेल्या ‘डॉन’, ‘त्रिशूल’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘कसमे वादे’ या चित्रपटांनी त्यांना सुपरस्टारवरुन मेगास्टार बनवलं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा