रोजच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश! गुडघे, सांधेदुखी, कंबरदुखी यावर उत्तम उपाय
महिलांमध्ये कॅल्शियमची विशेष कमतरता असते, ज्यामुळे त्यांना कंबर आणि सांध्यामध्ये भयंकर वेदना होतात. अशावेळी आपण आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कॅल्शियमयुक्त कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही रोजच्या आहारात खाऊ शकता.

मुंबई: निरोगी शरीर म्हणजे ज्यात पोषक तत्वांची कमतरता नसते. जो सर्व पोषक तत्वांनी समृद्ध आहार असतो. निरोगी राहण्यासाठी अशा आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कार्बोहायड्रेट, लोह, चरबी यासह अनेक आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे. या आवश्यक पोषक द्रव्यांमध्ये कॅल्शियम देखील समाविष्ट आहे. खरं तर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर कंबर आणि सांध्यात भयंकर वेदना होतात. हाडे आणि दात निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेमुळे शरीराला आरोग्याच्या समस्यांशी झुंज द्यावी लागते. चला तर मग जाणून घेऊया कॅल्शियमयुक्त कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही रोजच्या आहारात खाऊ शकता.
1. दही :
आपल्या आहारात दररोज दह्याचा समावेश करा. दही आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवते. याच्या सतत सेवनाने शरीराची हाडे मजबूत होतात. इतकंच नाही तर दही खाल्ल्याने आतडे निरोगी राहतात. दहीमध्ये पुरेसे प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 1 आणि व्हिटॅमिन बी 6 असते. तसेच हे खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळेल.
2. सोया मिल्क :
शरीरात कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी दूध उत्तम आहे, पण जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही आपल्या आहारात सोया मिल्कचा समावेश करू शकता. हा एक चांगला पर्याय असू शकतो. सोया दुधात कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने तुमची हिमोग्लोबिनची पातळीही टिकून राहील.
3. हिरव्या भाज्या :
आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्यास सुरुवात करा. यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल. हिरव्या भाज्या हा पोषक तत्वांचा खजिना आहे. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. कंबर आणि सांधे दुखत असतील तर हिरव्या भाज्या खाण्यास सुरुवात करा. या भाज्या तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतील. त्याचबरोबर हाडे आणि स्नायूंच्या वेदनाही कमी होतील.
