Health Care : वेलचीचे पाणी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

आजच्या काळात उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनत आहे. वाढत्या तणावामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. जर तुम्ही नियमितपणे वेलचीचे पाणी प्यायले तर तुमची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होते आणि हृदयरोग टाळता येतो.

Health Care : वेलचीचे पाणी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
वेलची
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 8:16 AM

मुंबई : वेलचीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतात. वेलचीचे दोन प्रकार आहेत. वेलचीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि सी, लोह, मॅग्नेशियम, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, फायबर, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम इत्यादी अनेक पोषक तत्त्वे आढळतात. (Cardamom water is beneficial for health)

हाय बीपी

आजच्या काळात उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनत आहे. वाढत्या तणावामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. जर तुम्ही नियमितपणे वेलचीचे पाणी प्यायले तर तुमची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होते आणि हृदयरोग टाळता येतो.

कोलेस्टेरॉल कमी करते

चुकीच्या आहारामुळे शरीरात खराब कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते. वेलची शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यासाठी उपयुक्त मानली जाते. तसेच, ते शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका कमी करते.

कर्करोगापासून संरक्षण

काही संशोधनात असे सुचवले आहे की, वेलचीच्या पाण्यात असलेले पोषक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म एखाद्या व्यक्तीला कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवण्याचे काम करतात. पण हे पाणी नियमित प्यावे लागते.

श्वसनाच्या समस्येसाठी

श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी वेलचीचे पाणी खूप चांगले मानले जाते. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट, अँटी-मायक्रोबियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी पोषक अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. दम्याच्या रुग्णांसाठीही वेलचीचे पाणी खूप प्रभावी आहे.

पाचक प्रणाली सुधारते  वेलचीचे पाणी प्यायले तर पचनक्रिया चांगली होते. गॅसची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केली जाते. दुसरीकडे, वेलचीचे सेवन केल्याने दातांच्या पोकळीची समस्या दूर होते.

वेलचीचे पाणी कसे बनवायचे

पाच वेलची सोलून आणि ठेचून एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. हे पाणी सकाळी उकळा. नंतर ते कोमट असताना प्या. हे पाणी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा प्यायल्याने त्याचे पूर्ण फायदे मिळतात. तसेच आपण दररोज जेवन केल्यानंतरही हे पाणी पिऊ शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Cardamom water is beneficial for health)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.