World Hearing Day 2023 : हेडफोन-ईअरफोनच्या सवयीमुळे वाढतोय बहिरेपणा, जाणून घ्या कितीवेळ वापरणे ठरते योग्य ?

ईअरफोन आणि हेडफोनचा वापर आजकाल खूप कॉमन झाला आहे. अनेकजणांच्या कानात सतत ईअरफोन दिसतात, पण त्यामुळे कानांच्या अनेक आजारांसह बहिरेपणाचाही धोका असतो.

World Hearing Day 2023 : हेडफोन-ईअरफोनच्या सवयीमुळे वाढतोय बहिरेपणा, जाणून घ्या कितीवेळ वापरणे ठरते योग्य ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 1:48 PM

नवी दिल्ली : आजकाल इअरफोन-हेडफोन (Earphone-Headphone) किंवा इअर बड्सचा (Ear Buds) वापर इतका वाढला आहे की 10 पैकी 9 लोक तुम्हाला कानात ते घालूनच फिरताना दिसतील. लांब पल्ल्याचा प्रवास करणारे लोक, विशेषतः ट्रेनमधून किंवा बाईकवरून प्रवास करणारे लोकं तासन्तास याचा वापर करताना दिसतात. एवढंच नव्हे तर रस्त्यावरून चालताना, ऑफिसमध्ये, जिममध्ये, पार्कमध्ये, अगदी घरातही लोकं हेडफोन कानात घालून काहीतरी ऐकत असताता किंवा बोलत राहतात आणि इतर कामंही करतात. या दरम्यान ते काम करणं व बोलणं एकाच वेळी करत असतात. या फायद्यामुळे ते ही उपकरणं तासन्तास कानात अडकवून ठेवतात, पण त्याच्या अतीवापरामुळे फायद्यापेक्षा तोटा (side effects) जास्त होतो हे तुम्हाला माहीत आहे का?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सामान्य जीवनात गॅजेट्सचा वापर वाढत असतानाच त्याच वेगाने आजारही वाढत आहेत. जी गोष्ट सुविधा देत आहे, त्याचे दुष्परिणामही होत आहेत. इअरफोन्स, हेडफोन्स, इअर बड्स इत्यादी गोष्टी आपल्या कानांसाठी अतिशय हानिकारक आहेत. पण लोकं त्याची पर्वा न करता त्यांचा भरपूर वापर करत आहेत.

वाढला फोनचा वापर

हे सुद्धा वाचा

ईअरफोन अथवा हेडफोनमुळे दैनंदिन व्यवहारात फोनचाही वापर वाढल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. जर एखादी व्यक्ती कानाला फोन लावून 10 मिनिटे बोलत असेल, तर इअरफोन, बड किंवा हेडफोन वापरून ती व्यक्ती कधीकधी 30-40 मिनिटे किंवा तासभरही बोलत बसतो. कारण फोनवर बोलताना तो धरून ठेवावा लागतो, पण हेडफोन अथवा इअरफोनमुळे तो त्रास वाचतो. हात मोकळे राहतात, त्यामुळेच इतर कामंही करता येतात. यामध्ये स्त्री-पुरुष, तरूण वर्गातील व्यक्ती सर्वांचाच समावेश आहे.

होत आहेत अनेक आजार

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ऐकण्याची समस्या असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एकतर त्यांना ऐकू येत नाही किंवा ते बहिरे झाले आहेत. आता केवळ प्रौढच नाही तर लहान मुलांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. श्रवण पेशींची संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे केवळ बहिरेपणाच नाही तर कानात ऐकू येणाऱ्या मोठ्या आवाजाचा कानाच्या कॅनलवर परिणाम होतो आणि चक्करही येऊ शकते. कानात तीव्र वेदना होऊ शकतात. जर तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतली नाही किंवा इअरफोन्सची देवाणघेवाण केली तर त्यामुळे कानात बॅक्टेरिया वाढू शकतात आणि गंभीर संसर्ग होऊ शकतो. यामुळे झोपेत बडबड करण्याची समस्या उद्भवू शकते. मेंदूच्या पेशी कमकुवत होतात आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो.

बड्सपेक्षा हेडफोन इअरफोन्स उत्तम

इअरफोन्स आणि इअरबड्स अधिक हानिकारक आहेत. त्यापेक्षा हेडफोन वापरणे काही प्रमाणात सुरक्षित आहे, परंतु हे लक्षात ठेवा की केवळ थोड्या काळासाठीच ते वापरावेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, इअरफोन्स, बड्स किंवा हेडफोन्स एकावेळी 15-20 मिनिटांपेक्षा जास्त काळ वापरू नयेत. बोलणे संपल्यावर लगेच ते कानातून काढून टाकावेत. त्यानंतर कानाला विश्रांती द्यावी. काही काळानंतर तुम्ही ते पुन्हा वापरू शकता. तसेच त्याचा वापर करताना आवाज खूप कमी ठेवा. आवाज जितका कमी असेल तितका कानाच्या आरोग्यावर कमी परिणाम होतो.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.