AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झालीय? मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच!

आपण वर्षभराहून अधिक काळ जागतिक महामारीचा सामना करत असून, कोविड-19 मुळे होणारी आणि काही वेळा दीर्घ काळ टिकणारी एक गुंतागुंत समोर आली आहे. ही गुंतागुंत आहे, वास घेण्याची क्षमता ("अॅन्सोमिआ") किंवा चव घेण्याची क्षमता ("अॅगेशिआ"), आणि काही वेळा या दोन्ही क्षमता गमावल्या जातात.

कोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झालीय? मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच!
कोरोना
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jun 16, 2021 | 12:41 PM
Share

मुंबई : आपण वर्षभराहून अधिक काळ जागतिक महामारीचा सामना करत असून, कोविड-19 मुळे होणारी आणि काही वेळा दीर्घ काळ टिकणारी एक गुंतागुंत समोर आली आहे. ही गुंतागुंत आहे, वास घेण्याची क्षमता (“अॅन्सोमिआ”) किंवा चव घेण्याची क्षमता (“अॅगेशिआ”), आणि काही वेळा या दोन्ही क्षमता गमावल्या जातात. अमेरिकेतील एका प्रमुख मासिकाच्या मते, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या जवळजवळ 86% रुग्णांनी वास घेण्याची क्षमता गमावल्याचे सांगितले आहे. इतकीच संख्या तोंडाची चव गेलेल्या रुग्णांचीही आहे. अशी तक्रार असलेले सहा दशलक्षहून अधिक रुग्ण असून ही संख्या वाढतेच आहे (Decreased ability to smell and taste after corona Then try this recipe by Dr Jennifer Prabhu).

सुदैवाने, चव व वास या क्षमता कमी झालेल्या रुग्णांना अन्न सेवन करण्यास मदत व्हावी, या दृष्टीने डॉक्टर, पोषणतज्ज्ञ व थेरपिस्ट यांच्याकडे आधीच काही उपाय आहेत. याविषयी सांगताना MT (ASCP), FAAP, FACP, सिरसी हेल्थ प्रा.लि.च्या सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. जेनिफर प्रभू (Dr Jennifer Prabhu) म्हणतात, रेडिएशन किंवा केमोथेरपी असे दीर्घकाळ चालणारे वैद्यकीय उपचार घेतल्याने या संवेदना कमी झालेल्या रुग्णांसाठी आम्हाला यापूर्वी उपाय करावा लागला आहे. तसेच, हे प्रश्न अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत. या संवेदना पुन्हा याव्यात यासाठी काही विशिष्ट पाककृती, चवी आणि पदार्थ वापरले जातात. असंख्य लोक इतक्या तीव्र स्वरूपामध्ये आजारी पडत असताना, या संवेदनांचा विचार करणे चुकीचे वाटू शकेल, पण या संवेदना गमावल्या तर तुमच्या मानसिक आरोग्यावर व शारीरिक आरोग्यावरही लक्षणीय परिणाम होऊ शकतो (जसे वजन घटणे, अपुरे पोषण होणे, इ.). काही “वासासाठी व्यायाम” जाणून घेऊया आणि त्यास मदत करू शकतील अशा पाककृती पाहूया…

अशा प्रकारे घ्या ‘स्मेल ट्रेनिंग’

ओलफॅक्टरी (स्मेल) नर्व्हना चालना देऊ शकतील आणि त्यांना पूर्वपदावर आणू शकतील, अशा काही दैनंदिन सवयी आहेत – काही गंधांचा वास घेणे, यास वैद्यकशास्त्रामध्ये “स्मेल ट्रेनिंग” असे म्हणतात. विविध प्रकारचे वास रोज जाणूनबुजून हुंगले, तर तुमच्या संवेदना पूर्वपदावर येण्यासाठी मदत होते, असे अभ्यासातून समोर आले आहे. हे वास म्हणजे लवंग किंवा दालचिनी अशा तीव्र वासाच्या मसाल्यांचे असू शकतात, किंवा लेवेंडर किंवा लिंबू अशा इसेन्शिअल ऑइलचे असू शकतात.

दिवसातून दोन वेळा, किमान चार वास प्रत्येकी 15 सेकंद तरी हुंगले पाहिजेत. यातून तुमच्या विचारांना व मनालाही चालना मिळते. यापैकी एखादा वास तुम्हाला येत नसेल, तर तो वास कसा असतो हे आठवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नर्व्ह कार्यरत होतील आणि आपोआप त्या वासाशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतील!

Dr jennifer Prabhu

डॉ. जेनिफर प्रभू

आहारात ‘हे’ पदार्थ सामील करा!

याचबरोबर आहारात पाककृतींच्या काही विशिष्ट घटकांचा देखील समवेश करा.

1)    आंबट – लोणचे, लिंबू किंवा चिंच अशा एखाद्या आंबट पदार्थाने जेवणाची सुरुवात केली, तर लाळ ग्रंथींना चालना मिळत असल्याने सिद्ध झाले आहे. यामुळे जेवणातील अन्य चवी तुमच्या चव घेण्याच्या संवेदनांना शोधता येऊ शकतात.

2)    उमामी – जपानीमध्ये उमामीचा शब्दशः अर्थ आहे “स्वादिष्टपणाची झलक”. यास आता पाचवी चव मानले जाते (गोड, आंबट, कडू व खारट यासह). सोय सॉस, लसूण, मिसो, मश्रूम, बटाटे व ट्रफल असे उमामी पदार्थही लाळ ग्रंथींना चालना देतात.

3)    तिखट – अनेक तिखट पदार्थांमध्ये असलेल्या कॅप्सेसिन या घटकामुळे ओलफॅक्टरी (स्मेल) नर्व्हचे व संबंधित ग्रंथींचे कार्य सुधारण्याची क्षमता प्राप्त होते. नाकातील मार्गिकांमध्ये अडथळे आले असतील, तर ते दूर करण्यासाठीही यामुळे मदत होते.

4)    चॉकलेट – चॉकलेट खाण्यासाठी कोणतेही कारण चालते ना? चव घेण्याची क्षमता गेली असेल, तर ती परत मिळवण्यासाठी अनेकदा केवळ चॉकलेट खाणे उपयुक्त ठरते.

5)    स्वरूप – वर नमूद केल्याप्रमाणे, एका पदार्थामध्ये निरनिराळ्या स्वरूपाचे घटक समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मऊ पदार्थ नको वाटत असतील, तर थोडे करकुरीत पदार्थ समाविष्ट करा. काही वेळा अन्न पदार्थांपेक्षा पातळ पदार्थ घेणे सोयीचे वाटते (शेक किंवा सूप).

6)    तापमान – अनेक कोरोना रुग्णांना गरम किंवा कोमट पदार्थांऐवजी थंड किंवा फ्रोझन पदार्थ बरे वाटतात, असे अभ्यासात आढळले आहे. गरम पदार्थ खाण्याचा विचार तुम्हाला त्रासदायक वाटत असेल. तर तो पदार्थ गरम न करता खाण्याचा विचार करा किंवा फ्रुट स्मूदी किंवा कोल्ड सिरप घ्यायचा विचार करा.

7)    सातत्य महत्त्वाचे – हताश किंवा निराश न होण्याचा प्रयत्न करा. चव घेण्याच्या संवेदना पुन्हा जागृत व कार्यरत होण्यासाठी सतत प्रयत्न करणे व निरनिराळ्या चवी चाखून बघणे गरजेचे आहे. या आठवड्यात एखादे विशिष्ट अन्न बेचव वाटत असेल, तर काही दिवसांनी ते पुन्हा खऊन बघा. ही चव कशी विकसित झाली किंवा बदलली हे पाहून कदाचित तुम्हालाच आश्चर्य वाटेल!

वर नमूद केलेल्या काही पद्धतींचा अवलंब करणाऱ्या विशिष्ट पाककृती आता पाहूया. यामध्ये तीव्र चवी व वास आहेत. त्यांचे स्वरूपही निरनिराळे आहे. त्यामध्ये तुमच्या शरीराच्या आणखी एका संवेदनेचा वापर केला जातो. योग्य प्रकारे काम करत असलेल्या संवेदनेचा वापर केला तर अकार्यक्षम झालेल्या बाकी संवेदना पुन्हा मिळवण्यासाठी मदत मिळू शकते.

चिकपी मिसो लेमन नूडल सूप (4 व्यक्तींसाठी)

साहित्य:

  • 1 टी-स्पून ऑलिव्ह ऑइल
  • 1 लहान लाल किंवा पांढरा चिरलेला कांदा
  • 4 लसणाच्या बारिक चिरलेल्या पाकळ्या
  • 5 कप – अंदाजे 1 लिटर व्हेजिटेबल ब्रोथ
  • 1.5 कप (255 ग्रॅम) उकडलेले हरभरे
  • ½ कप तुमच्या आवडीचा (न शिजवलेला) पास्ता
  • एका लिंबाचा रस
  • 2 टेबलस्पून मिसो
  • चवीनुसार मीठ, मिरी

कृती:

  1. एका मध्यम आकाराच्या भांड्यात मंद आचेवर तेल गरम करा.
  2. त्यात चिमूटभर मीठ घालून लसूण व कांदा भाजून घ्या. त्यांचा रंग बदलेपर्यंत काही मिनिटे ते शिजवा.
  3. नंतर यात ब्रोथ घाला आणि तुमचा ब्रोथ व्यवस्थित तयार करण्यासाठी 20-30 मिनिटे उकळा.
  4. त्यात शिजवलेले हरभरे व पास्ता घाला आणि ते पूर्ण शिजेपर्यंत साधारण 10 मिनिटे शिजवा. आच मंद ठेवा.
  5. आता वरील मिश्रणात मिसो घाला आणि त्याच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत ढवळत राहा.
  6. त्यात लिंबू रस टाका, चवीनुसार मीठ व मिरी घाला.
  7. गरमागरम लगेचच सर्व्ह करा. सजवण्यासाठी क्रॅकर्स किंवा तळलेला कांदा वापरा.

व्हेगन मेक्सिकल चॉकलेट ब्रेकफास्ट स्मूदी (1 व्यक्तीसाठी)

साहित्य:

  • ½ कप ओट्स
  • 1 कप प्लास्ट-बेस्ड मिल्क (बदाम, सोय, नारळ, ओट)
  • 1 टेबल-स्पून अनस्वीटन्ड कोको पावडर किंवा चॉकलेट सिरप
  • 1 टी-स्पून दालचिनी पावडर
  • ¼ टी-स्पून केयेन पेप्पर (लाल मिरची) पावडर
  • 1-2 टी-स्पून ब्राउन शुगर, अगेव नेक्टर, मध किंवा मॅपल सिरप
  • 1 केळं, किमान 6 तास अगोदर कापलेले व थंड करत ठेवलेले

कृती:

  1. एका भांड्यामध्ये केळ्याव्यतिरिक्त सर्व साहित्य एकत्र करा. ते भांडे रात्रभर एखाद्या थंड जागी झाकून ठेवा
  2. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये केळं टाका आणि हे मिश्रण ब्लेंडरमध्ये घाला आणि त्याची स्मूदी तयर करा.
  3. ही स्मूदी लगेचच सेवन करा.

या पाककृतींमुळे तुमच्या वास व चव या संवेदना जागृत होऊ लागतील, अशी अपेक्षा आहे. वर नमूद केलेले घटक आणि पद्धत वापरून कदाचित तुम्ही स्वतः त्यातून नव्या पाककृती देखील तयार करू शकाल.

(टीप : उपरोक्त लेख हा MT (ASCP), FAAP, FACP, सिरसी हेल्थ प्रा.लि.च्या सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारीव्यवस्थापकीय संचालक डॉ. जेनिफर प्रभू यांच्या माहितीवर आधारित आहे. डॉ. प्रभू इंटर्नल मेडिसिन आणि पेडिअॅट्रिक्स यामध्ये डबल बोर्ड-सर्टिफाइड डॉक्टरही आहेत.)

(Decreased ability to smell and taste after corona Then try this recipe by Dr Jennifer Prabhu)

हेही वाचा :

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये किंचीत वाढ, कोरोनाबळींचा आकडा मात्र घटला

बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती यशस्वी, रुग्ण दुसऱ्याच दिवशी घरी, राज्यातील पहिलाच प्रयोग

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?