Delta Plus: डेल्टा प्लस किती धोकादायक, लस घेतलेल्यांना संसर्ग होतो? नव्या वेरिएंटमुळं तिसरी लाट येईल?

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर जगासमोर डेल्टा प्लस वेरिएंटचं नव संकट उभ राहिलं आहे. डेल्टा प्लस वेरिएंट विषयी तज्ज्ञांनी कोणती माहिती दिली हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

Delta Plus: डेल्टा प्लस किती धोकादायक, लस घेतलेल्यांना संसर्ग होतो? नव्या वेरिएंटमुळं तिसरी लाट येईल?
Corona Update
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 11:02 AM

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर जगासमोर डेल्टा प्लस वेरिएंटचं नव संकट उभ राहिलं आहे. डेल्टा प्लसचा संसर्ग वेगानं होतो, त्याशिवाय हा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग करतो, असा अंदाज आहे. काही रिपोर्टनुसार असा हा डेल्टा प्लसचा वेरिएंट कोरोना विषाणू उपचारात वापरली जाणारी औषधे आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रभाव नष्ट करतो, असं देखील म्हटलं गेलं. डेल्टा प्लस विषयी नागरिकांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात डॉ. तन्नू सिंघल यांनी हिंदुस्थान टाईम्सला माहिती दिली आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. (Delta Plus more virulent it infected person infected previous know details about delta mutation)

डेल्टा प्लस वेरिएंट कोरोना लसीच्या क्षमतेला प्रभावित करतो?

डॉ. सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा वेरिएंटनं रुप बदलल्याननंतर डेल्टा प्लस वेरिएंट निर्माण झाला आहे. डेल्टा वेरिएंट सर्वप्रथम भारतात दुसऱ्या लाटेदरम्यान आढळून आला होता. त्याची दोन म्यूटेशन झाली होती त्यामध्ये L452 आणि E484 ही त्यांची नाव होती. डेल्टा वेरिएंट उच्च क्षमतेचा संक्रामक होता आणि घातक देखील होता. पण त्याचा लसीच्या क्षमेतवर कोणाताही परिणाम जाणवला नव्हता. तर, डेल्टा प्लस वेरिएंट अलीकडे आढळून आला आहे. भारतात सध्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. डॉ. सिंघल म्हणाले की डेल्टा प्लस वेरिएंट विषयी आपल्याकडे सध्यातरी सविस्तर माहिती नाही. डेल्टा प्लसची संक्रामकता, घातकता आणि व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर किती परिणाम होतो हे आपल्याला सध्या तरी माहिती नाही. हे कोरोना विषाणूचं K417N म्यूटेशन आहे. याच प्रकारचा वेरिएंट ब्राझीलमध्ये आढळला होता, त्यानं लसीच्या क्षमतेला प्रभावित केलं होतं. मात्र, डेल्टा प्लसचा कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर, रोगप्रतिकार शक्तीवर किती प्रभाव पडेल हे सविस्तर माहिती आणि डाटा उपलब्ध नसल्यानं सांगतो येत नाही, अंस सिंघल यांनी म्हटलं.

राजस्थानातील एका महिलनं कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तिला डेल्टा प्लस वेरिएंटचा संसर्ग झाला होता. मात्र, त्याची तीव्रता कमी होती. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना डेल्टा प्लसची लागण होऊ शकते. मात्र, त्याचा प्रभाव कमी स्वरुपात असेल, असा अंदाज बांधता येतो, असं सिंघल म्हणाले.

कोरोनातून एकदा बरं झालेल्यांना पुन्हा संसर्ग होतं आहे, डेल्टा प्लसचा संसर्ग होऊ शकतो?

एकदा कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याची प्रकरण फार कमी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्गित झालेल्या व्यक्तींना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी प्रमाणात संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. यावरुन आपण असं म्हणू शकतो की कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग झाल्यानंतर निर्माण झालेल्या व्यक्तींच्या शरीरात निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे कोरोनाच्या वेरिएंटपासून वाचण्यासाठी मदत होते, असं समोर आलं आहे. मात्र, डेल्टा प्लसच्या बाबतीत असं होऊ शकते का याबाबत तसं होतं का पाहावं लागेल, असं डॉ. सिघंल म्हणाले. सध्या ज्या व्यक्तींना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झालेला आहे त्यांच्यात सौम्य लक्षणं आढळली आहेत. त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावं लागल्याचं समोर आलेलं नाही,असंही त्यांनी सांगितलं.

डेल्टा प्लस वेरिएंटचा संसर्ग झाल्याची लक्षणं कोणती? ती डेल्टा आणि अल्फा वेरिएंटपेक्षा वेगळी असतात का?

आपल्याकडे डेल्टा प्लसच्या संसर्गाची लक्षणं कोणती सांगता येणार नाही कारण आपल्याकडे त्यासाठी आवश्यक असा डाटा नाही. त्यामुळे डेल्टा प्लस आणि डेल्टा वेरिएंटची सध्या तुलना करणं शक्य नाही, सिंघल म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखा डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येऊ शकते का? आपण कशी तयारी केली पाहिजे? लस आणि ऑक्सिजन संदर्भात ? कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपल्याकडे सेरो सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार त्यावेळी 60 ते 70 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचं आढळलं होतं. लोकांमध्ये नैसर्गिक रित्या प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. आपण सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करत आहोत. कोरोनाची तिसरी लाट आलीचं तर ती दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सौम्य असावी, असा अपेक्षा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपल्या नागरिकांसह सर्वांचा भारतीयांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्याचा समज झाला. आपण कोरोना लाट गेल्याच्या संभ्रमात राहिल्यानं दुसऱ्या लाटेत जे काही झालंय ते पाहिलय. प्रशासनानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली पाहिजे. ऑक्सिजन, नियमित आरोग्य सेवा उभारल्या पाहिजेत, यामुळं आपण भविष्यात येणाऱ्या आरोग्य विषयक संकटावर मात करु शकतो, असं सिंघल यांनी म्हटलं आहे.

कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किती लाटा येतील?

कोरोना विषाणूच्या लाटा किती येऊ शकतात यासंदर्भात आपल्या कुणाकडेच याचं उत्तर नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या साथ रोगांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की साधारण पणे तो साथरोग दोन वर्ष राहिला होता. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात येण्यासाठी जवळपास 6 महिने लागतील, असं डॉ. सिंघल म्हणाले.

संबंधित बातम्या: 

लसीकरण या एकाच मंत्राने तिसरी लाट थोपवता येईल, आरोग्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

देशातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 70 च्या आसपास, मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी तयार: किशोरी पेडणेकर

(Delta Plus more virulent it infected person infected previous know details about delta mutation)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.