AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरात Disease X चा धोका वाढला, आतापर्यंत 140 रुग्णांचा मृत्यू; कसा पसरतो हा आजार?

Disease X Causes symptoms: जगभरात Disease X चा धोका वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबाबत अलर्ट जारी केला आहे. कारण, Disease X आजाराचे रुग्ण वाढत आहेत.  

जगभरात Disease X चा धोका वाढला, आतापर्यंत 140 रुग्णांचा मृत्यू; कसा पसरतो हा आजार?
Disease X
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 3:01 PM
Share

Disease X Causes symptoms : आफ्रिकेत Disease X आजारामुळे 140 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात Disease X चा धोका वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबाबत अलर्ट जारी केला आहे. आहे हा आजार आणि त्याला Disease X असे नाव का देण्यात आले? याविषयी विस्ताराने जाणून घेऊया.

मंकीपॉक्सची प्रकरणं अजून थांबली नसती तर मारबर्ग व्हायरस आफ्रिकेत आला होता. ज्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूनंतर आता आफ्रिकेत Disease X चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. एका आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 7 महिन्यांपूर्वी अलर्ट जारी केला होता. आता त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आफ्रिकेतील अनेक भागात 140 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Disease X बद्दल अद्याप फारच कमी माहिती उपलब्ध आहे, यामुळे या आजाराला कोणतेही विशिष्ट नाव देण्यात आलेले नाही. पण हे नव्या प्रकारच्या विषाणूमुळे असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2018 मध्ये पहिल्यांदा Disease X चा उल्लेख करण्यात आला होता. पण त्यानंतरही हा आजार काय आहे हे कळू शकले नाही. काही भागात लोकांना फ्लूसारखी लक्षणे दिसत होती आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

Disease X नंतरच कोव्हिड महामारी जगभरात आली आणि लाखो रुग्णांचा मृत्यू झाला. Disease X चा संसर्ग कसा होत आहे हे अद्याप माहित नाही. परंतु संसर्ग झाल्यानंतर अल्पावधीतच रुग्णांचा मृत्यू होत आहे. वाढती प्रकरणे आणि मृत्यू लक्षात घेता WHO ने Disease X बाबत जागतिक स्तरावर अलर्ट जारी केला आहे.

Disease X आजाराचे परिणाम काय?

मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये आतापर्यंत Disease X चे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आफ्रिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत नोंद झालेल्या 386 प्रकरणांपैकी सुमारे 200 प्रकरणे 5 वर्षांखालील मुले आहेत.

Disease X कसा पसरतो?

Disease X हा आजार कसा पसरतो हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो आणि श्वसनाच्या माध्यमातून पसरतो, असे मानले जाते.

सध्या WHO ने हा आजार रोखण्यासाठी आवश्यक औषधे आणि काही तज्ज्ञ आफ्रिकेत पाठवले आहेत, मात्र हा आजार वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Disease X ची लक्षणे काय आहेत?

ताप डोकेदुखी अंगदुखी श्वास घेण्यास त्रास होणे

Disease X पासून संरक्षण कसे करावे?

संक्रमित भागात जाणे टाळा फ्लूची लक्षणे असल्यास उपचार घ्या हात धुवून खा खाण्यापिण्याची काळजी घ्या

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान