AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिवळ्या दातांमुळे त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी दातांवरील चमक वाढवा

चमकदार दात कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालतात. परंतु अनेक वेळा दातांची योग्य निगा राखली नाही की तेच दात आपल्यात कमीपणाची भावनाही निर्माण करीत असतात. पिवळे दात हे आजकाल सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे.

पिवळ्या दातांमुळे त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी दातांवरील चमक वाढवा
दात
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 11:03 AM
Share

आपण नेहमी म्हणत असतो. स्त्रीयांचे सौंदर्य हे तिच्या केसांमध्ये असते. त्याचप्रमाणं दात हे आपल्या चेहर्यावरील सौंदर्यात भर घालत असतात. पांढरेशुभ्र व चमकदार दात असतील तर आपला चेहरा अधिक आकर्षक दिसत असतो. त्यामुळे दातांच्या आरोग्याला अधिक महत्व प्राप्त होताना दिसून येते. दात हे आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. ज्यावेळी आपण बोलतो किंवा हसतो तेव्हा आपसूकच समोरच्या व्यक्तीची पहिली नजर आपल्या दातांवर जात असते. स्वच्छ, पांढरे व चमकदार (shine) दात असतील तर त्यामुळे आपले व्यक्तीमत्व (personality) अधिक प्रभावी दिसत असते. त्याउलट जर पिवळे दात (yellow teeth) असतील तर ते समोरच्यालाही किळसवाणे वाटते.

त्यामुळे दातांचा आपल्या व्यक्तीमत्वावर तसेच लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण यावरही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. अनेक जण दात नीट स्वच्छ करीत नाहीत. दातांची निगा राखत नाही. परिणामी त्यांना पिवळ्या दातांच्या समस्येचा सामना करावा लागत असतो. दात स्वच्छ करण्यासाठी अनेक महागडे उपचार घ्यावे लागत असता. परंतु आज आम्ही तुम्हाला घरगुती पध्दतीने दात कसे स्वच्छ करावे, याची माहिती देणार आहोत.

दातं पिवळी का दिसतात?

बदलत्या जीवनपध्दतीमुळे अनेकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीदेखील वेळ नसतो. दातांची योग्य निगा राखली नाही की दात पिवळी होण्याची शक्यता असते. सोबतच धूम्रपान, गुटखा, मावा, तंबाखू आदींचे सेवन केल्यानेही दात पिवळी किंवा खराब होत असतात. या शिवाय चुकीच्या डाएटचा समावेश केल्यानेही दाताची समस्या निर्माण होत असते.

पिवळ्या दातांवर उपाय :

1) रोज ब्रश करावा

अनेकदा असे दिसून येते, की ब्रश करण्याचा अनेकांना अतिशय कंटाळा असतो. ब्रश करतानाही तो योग्य पध्दतीने केला जात नाही. केवळ वरच्यावर दातांना ब्रश केला जात असतो. त्यामुळे दातांची योग्य सफाई होत नाही. परिणामी दात पिवळे होण्याची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे योग्य पध्दतीने ब्रश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात असतो. तसेच दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करणे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

2) बेकिंग सोडा

दातांना चमकदार करण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उत्तम पर्याय आहे. टूथपेस्टवर चिमुटभर बेकिंग सोडा टाकून चांगल्या पध्दतीने ब्रश करावा, त्यानंतर गुळण्या करुन दात स्वच्छ करावेत, असे आठवड्यातून दोन वेळा केल्यास पिवळ्या दातांची समस्या मुळापासून नष्ट होउन जाईल.

3) कोकोनट ऑईल पुलिंग

तोंडाच्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून कोकोनट ऑईल पुलिंगकडे पाहिले जात असते. कोकोनट ऑईल पुलिंगमध्ये खोबरेल तेलाच्या गुळण्या केल्या जात असतात. सकाळी हे केल्यास तोंडातील विषारी घटक हे बाहेर टाकले जातात तसेच दातांचा पिवळेपणा नष्ट करण्याठीही कोकोनट ऑईल पुलिंग या पध्दतीचा वापर केला जात असतो. यासाठी चांगल्या दर्जाच्या खोबरेल तेलाचा वापर करणे आवश्‍यक आहे. एक घोट तेल तोंडात घेउन साधारणत: एक मिनीटे ते तोंडात चांगल्या पध्दतीने फिरवा व नंतर गुळणी बाहेर टाका. असे केल्याने तोंडातील सर्व विषारी घटक बाहेर टाकले जातात.

4) ॲप्पल साइडर विनेगर

दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी ॲप्पल साइडर विनेगर एक प्रभावी माध्यम आहे. दोन चमचे ॲप्पल साइडर विनेगर दीडशे Ml पाण्यात टाकून ते एक ते दोन मिनिटे तोंडात फिरवा, त्यानंतर गुळणी बाहेर टाकून ब्रश करावा, असे केल्याने पिवळे दात चमकदार होतात.

5) संत्र्याची साल

दातांवरील पिवळेपणा काढण्यासाठी संत्र्याची साल अत्यंत प्रभावी समजली जात असते. संत्र्याची साल आपल्या दातांवर किमान दोन मिनिटे रगडावी, यात एक काळजी घेणे गरजेचे आहे, साल हलक्या हातांनी रगडावी नाहीतर आपल्या हिरड्यांना त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

6) ॲक्टीव्हेटेड चारकोलचा वापर

ॲक्टीव्हेटेड चारकोलच्या माध्यमातून आपल्या दातावरील पिवळेपणा जाण्यास मदत होत असते. ॲक्टीव्हेटेड चारकोल एक ग्लास पाण्यात मिसळून साधारणत: दोन मिनीटे त्याने गुळण्या कराव्यात, यामुळे तोंडातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच दातही पांढरेशुभ्र होतात.

संबंधित बातम्या : 

मेंदूच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको… मोजावी लागेल मोठी किंमत

Papaya side effects : नंतर पश्चापात करण्यापेक्षा आधीच पपईचे फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या! 

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...