तुम्हीही घेता प्रत्येक गोष्टीचे टेंशन?; तर वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार
प्रत्येक व्यक्तीच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. अनेक व्यक्ती असे असतात की जे कधीच टेंशन (Tension) घेत नाहीत, नेहमी आनंदी राहातात. तर काही व्यक्ती या छोट्या - छोट्या गोष्टींचे देखील टेंशन घेतात. छोट्या-छोट्या गोष्टींचे टेंशन घ्यायची सवय लागण्याने त्यांच्या मनावर अतिरिक्त ताण निर्माण होतो.

Health Tips : प्रत्येक व्यक्तीच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. अनेक व्यक्ती असे असतात की जे कधीच टेंशन (Tension) घेत नाहीत, नेहमी आनंदी राहातात. तर काही व्यक्ती या छोट्या – छोट्या गोष्टींचे देखील टेंशन घेतात. छोट्या-छोट्या गोष्टींचे देखील टेंशन घ्यायची सवय लागण्याने त्यांच्या मनावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. हा ताण पुढे अनेक समस्यांचे (Tension health issue)कारण बनतो. सतत टेंशनमध्ये राहिल्यामुळे अनेक आजारांचा धोका असतो. जर तुम्हालाही अशीच सवय असेल तर वेळीच सावध व्हा. या सवयीमुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकता. काही व्यक्ती तर टेंशनमध्ये आत्महत्या देखील करतात. अशा अनेक घटना आपण पहात असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल माहिती देणार आहोत. जे आजार ताण तणावातून निर्माण होतात.
टेशंनमुळे होणारे आजार
त्वचा रोग – (Skin diseases)-जर तुम्ही सतत टेशंन घेत असाल तर तुम्हाला त्वचेशी संबंधित अनेक आजार होऊ शकता. ज्यामध्ये सोरायसिस, तोंडावर पिंपल येणे, तसेच इतर समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.
वजनामध्ये बदल – जे व्यक्ती सातत्याने टेंशनमध्ये असतात त्या व्यक्तीच्या वजनावर देखील त्याचा परिणाम होतो. अनेकवेळा अशा व्यक्तींचे वजन प्रचंड प्रमाणात वाढते. किंवा काही वेळेस अशा व्यक्तींचे वजन हे कमी होऊन व्यक्ती अशक्त बनते.
डोके दुखणे, केसांची गळती – जे व्यक्ती सतत टेंशनमध्ये असतात त्यांच्यामध्ये केस गळतीची समस्या दिसून येते. तसेच अशा व्यक्तींना डोके दुखीचा देखील सतत त्रास होतो. त्यामुळे आयुष्यात घडणाऱ्या छोट्या, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
हृदयाशी संबंधित विविध आजार – जे व्यक्ती सतत टेंशनमध्ये असतात अशा व्यक्तींना हृदयाशी संबंधित विविध आजार होण्याची दाट शक्यता असते. अशा व्यक्तींमध्ये हृदविकाराच्या धक्क्याचे प्रमाण देखील अधिक असते. अति ताण तनावामुळे अकाली मृत्यू ओढावू शकतो. त्यामुळे तुमच्यावर येणाऱ्या ताणाचे योग्य व्यवस्थापन केरणे अधिक गरजेचे असते.
संबंधित बातम्या
अधिक व्हिटॅमिन डी शरीराला असते धोकादायक; तर होऊ शकतात ‘हे’ आजार