Immunity Boosting Drinks : सर्दी, खोकला या सारख्या आजारांपासून बचावासाठी घ्या होममेड इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स

Immunity Boosting Drinks : सर्दी, खोकला या सारख्या आजारांपासून बचावासाठी घ्या होममेड इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स

तुळसीचा चहा, मसाले चहा, विविध हर्बल चहा यांच्या नियमित सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकल्यासारख्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो. आज आपण अशाच काही आयुर्वेदिक काढ्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 25, 2022 | 6:07 PM

तुम्ही काय खातात किंवा पिता याची तुमचे आरोग्य कसे आहे यात महत्त्वाची भूमिका असते. कोरोना काळात तर आरोग्याची (Health) अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. दररोज वेळच्यावेळी जेवन, पुरेशा प्रमाणात झोप, योग्य तेवढा आराम आणि नियमीत व्यायाम या गोष्टींमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती (immune system) वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातील तज्ज्ञ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद, लवंग, काळे मिरे, मोहरी, धने इलायची, जीरे आणि मिरचीचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला देतात. मात्र आपल्याला अनेकवेळा हेच माहित नसते की, या मसाल्यांच्या पदार्थांचा आहारामध्ये कसा समावेश करावा, व कितीप्रमाणात करावा. तुम्ही हे मसाल्यांचे पदार्थ दूध आणि कॉफीमध्ये (Immunity Boosting Drinks) टाकून देखील घेऊ शकता. तुळसीचा चहा, मसाले चहा, विविध हर्बल चहा हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आज आपण अशाच काही इम्युनिटी बस्टर ड्रिक्सबद्दल जाणून घेणार आहोत.

हळदीचा चहा : हळदीमध्ये मोठ्याप्रमाणात करक्यूमिनचा साठा असतो. करक्यूमिनमुळे तुमच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसचे यामुळे अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो. तुम्हाला जर इम्युनिटी वाढवायची असेल तर हळदीच्या चहाचे सेवन करावे. हळदीचा चहा बनवण्यासाठी सर्व प्रथम एक कप पाण्यात तुळसीचे दोन पाने टाका. त्यांना चागल्या प्रकारे उकळून घ्या. त्यानंतर त्यात दूध टाका त्यानंतर त्यात थोडीशी हळद, एक इलायची, एक लवंग, एंक काळी मिरी, आणि केसरच्या एक ते दोन काड्या टाका. त्यानंतर या मिश्राणाला पुन्हा एकदा चांगली उकळी येऊद्या त्यानंतर तुम्ही या चहाचे सेवन करू शकता.

अलिव्ह सीड्स : अलिव्हच्या बियांमध्ये मोठ्याप्रमाणात पोषण तत्त्व असतात. सोबतच त्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए आणि सी, कॅल्शिअम देखील मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्ही दररोज रात्री झोपताना अलिव्हच्या पाच ते सहा बिया पाण्यात भिजत घालून सकाळी हे पाणी पेऊ शकतात. तसेच तुम्ही दही कींवा ताकासोबत देखील अलिव्ह बियांचे सेवन करू शकता.

काढा : आयुर्वेदिक काढ्याच्या नित्यसेवनाने तु्मची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोबतच हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला या सारख्या आजारांपासून देखील तुम्ही दूर राहाता. काढ्यामध्ये तुळस, जीरे, काळी मिरी, हळद अशा विविध पदार्थांचा उपयोग होतो.
विविध मसाल्यांच्या पदार्थांपासून बनवण्यात आलेल्या या काढ्यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते.

टीप : वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली आहे. कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या 

अधिक व्हिटॅमिन डी शरीराला असते धोकादायक; तर होऊ शकतात ‘हे’ आजार

Budget 2022: यंदाच्या बजेटमध्ये सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानाची व्याप्ती वाढवणार? जाणून घ्या महत्वाचे मुद्दे!

खरंच कोणी आठवण काढली तर उचकी लागते का? उचकी लागण्याची कारणं आणि त्यावरील उपाय..

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें