सकाळी उठल्याबरोबर ‘तीव्र डोकेदुखी’ होते का? दुर्लक्ष करू नका, ब्रेन ट्यूमरची लक्षणे असू शकतात, वाचा सविस्तर…

World Brain Tumor Day 2022 : सकाळी उठल्याबरोबर तीव्र डोकेदुखी होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे ब्रेन ट्यूमरची असू शकतात. जाणून घ्या या आजाराशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी...

सकाळी उठल्याबरोबर ‘तीव्र डोकेदुखी’ होते का? दुर्लक्ष करू नका,  ब्रेन ट्यूमरची लक्षणे असू शकतात, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 1:13 PM

मुंबई : ब्रेन ट्यूमरचे गांभीर्य (The severity of brain tumors) आणि त्याचे निदान याविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. यानिमीत्ताने, ब्रेन ट्यूमरची कारणे, चिन्हे, प्रकार आणि उपचार याबद्दल यानिमीत्त जनजागृती केली जाते. जेव्हा मेंदूतील पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि गुठळ्यांचे रूप घेतात तेव्हा या स्थितीला ब्रेन ट्यूमर म्हणतात. ब्रेन ट्यूमर दरम्यान, मेंदूच्या एका विशिष्ट भागात पेशींचा समूह तयार होतो, ज्यामुळे धोकादायक परिस्थिती (Dangerous situation) निर्माण होते. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर त्याचे रूपांतर कर्करोगातही होऊ शकते. जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस 2022 ट्यूमरबद्दल जागरूकता (Awareness) निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 जून रोजी साजरा केला जातो. जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशनने 2000 मध्ये याची सुरुवात केली होती.

ब्रेन ट्यूमर

सौम्य ट्यूमरचे दोन प्रकार असतात ही गाठ मेंदूच्या पेशींमधून तयार होते आणि त्याच्या वाढीचा वेग खूपच मंद असतो. हा कर्करोग नसलेला ट्यूमर आहे.

घातक ट्यूमर

ही गाठ अधिक धोकादायक मानली जाते. ही गाठ मेंदूच्या पेशींपासून देखील बनते. परंतु, त्याची वाढ जलद होते. ही गाठ कर्करोगातही बदलू शकते.

हे सुद्धा वाचा

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

तीव्र डोकेदुखी हे सर्वात मोठे लक्षण आहे, जरी ब्रेन ट्यूमरची अनेक चिन्हे आहेत, परंतु सकाळी उठल्यानंतर तीव्र डोकेदुखी हे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. याशिवाय चक्कर येणे, मळमळ होणे, स्मरणशक्ती कमी होणे, शरीर सुन्न होणे, दृष्टी कमी होणे, तणाव, नैराश्य, अचानक मूर्च्छा येणे, बोलण्यात अडचण येणे, चालताना अडखळणे इत्यादी लक्षणे ब्रेन ट्यूमरची आहेत.

ब्रेन ट्यूमरची कारणे

ब्रेन ट्यूमरचे कोणतेही स्पष्ट कारण अद्याप कळू शकले नसले तरी तज्ज्ञ आनुवंशिकतेचे कारण मानतात. याशिवाय रेडिएशनच्या सतत संपर्कात राहिल्यास मेंदूमध्ये ट्यूमर देखील विकसित होऊ शकतो.

ब्रेन ट्यूमर उपचार

ब्रेन ट्यूमर ही असाध्य समस्या नाही, परंतु त्यावर जितक्या लवकर उपचार केले जातील तितके चांगले. सामान्यतः ट्यूमरचे स्थान आणि आकार पाहून त्यावर उपचार केले जातात. त्यावर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, मायक्रो एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जरी, रेडिओ सर्जरी, टार्गेट ड्रग थेरपी याद्वारे उपचार केले जातात. ब्रेन ट्यूमर गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी, त्याच्या लक्षणांबद्दल जागरूक रहा. येथे नमूद केलेली लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ञाचा सल्ला घ्या.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.