उपाशी पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
भारतात अनेकांना चहा पिण्याची सवय आहे. सकाळी उठल्यानंतर चहाचा कप हाती लागतो. मात्र यामुळे काय नुकसान होऊ शकतं याची कल्पना देखील नाही. उपाशी पोटी चहा प्यायल्याने काय होतं ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

भारतीय आणि चहाचं रोजचं नातं आहे. चहाशिवाय अनेकांची दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्यावर चहाचे दोन घोट घेतल्यानंतर फ्रेश वाटतं. त्यामुळे अनेक जण सकाळी उठल्याबरोबर चहाचा कप तोंडाला लावतात. पण उपाशी पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो माहिती आहे का? यामुळे पोटात आम्लता वाढते. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर या नियमांचं पालन केलं तर नक्कीच आरोग्याचं नुकसान होणार नाही. एम्स दिल्लीत गॅस्ट्रोलॉजी विभागाच्या माजी डॉ. अनन्य गुप्ता यांच्या मते, जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा तुमचा पोट रिकामी असतं. यामुळे पोटात गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच अॅसिड अधिच सक्रिय असते. अशा वेळी तुम्ही जर चहा (दूध असलेला चहा) घेता तेव्हा अॅसिड वाढतं. त्यामुळे अॅसिडिटी, पोटात जळजळ, गॅस आणि ब्लोटिंगसारखी समस्या होते.
चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन असते. त्यामुळे पचन प्रक्रिया खराब होऊ शकते. टॅनिनमुळे पचनप्रक्रिया मंद होते आणि भूक मरते. यामुळे उपाशी पोटी चहा घेतल्याने नैसर्गिक प्रक्रियेला नुकसान होऊ शकतं. यामुळे गॅस्ट्रिक समस्या वाढण्याची शक्यता असते. सकाळी चहा प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. तसेच आंबट ढेकर आणि गळ्यात जळजळ होते. भूक लागत नाही आणि जेवायची इच्छा राहात नाही. दुपारपर्यंत पोटात गॅस आणि ब्लोटिंग राहते. जर अशी लक्षणं वारंवार दिसत असतील तर सकाळचा चहा तुमच्यासाठी चांगला नाही.
पोषण तज्ज्ञांच्या मते, “जर सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय बराच काळ राहिली तर त्यामुळे पोटातील तीव्र आम्लता आणि जठराची सूज यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.”अॅसिडिटीपासून वाचण्यासाठी चहा पिण्यापूर्वी काहीतरी खा. भिजलेले बदाम, केळं किंवा सुखा टोस्ट खा. चहासाठी पर्याय शोधा. हर्बल किंवा ग्रीन टी प्या. यामध्ये कॅफीनचं प्रमाण कमी असतं. सकाळी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पोट शांत करतं. जर चहा प्यायचाच झाला तर नाश्ता करताना किंवा केल्यानंतर प्या.
