AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

knee pain: अनियमित दिनचर्येमुळे तरूणांमध्ये वाढतोय गुडघेदुखीचा त्रास

अनियमित जीवनशैली तसेच जंक फूडचे अधिक प्रमाणात सेवन करणे यामुळे तरुणांमध्ये गुडघेदुखीचा त्रास वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

knee pain: अनियमित दिनचर्येमुळे तरूणांमध्ये वाढतोय गुडघेदुखीचा त्रास
| Updated on: Nov 17, 2022 | 1:15 PM
Share

नवी दिल्ली – अनियमित दिनचर्या तसेच जंक फूडचे (junk food) अधिक प्रमाणात सेवन करणे यामुळे तरूणांच्या गुडघ्यातील ग्रीस ( सिनोव्हिअल फ्लुइड) हे कमी होत आहे. याच कारणामुळे तरुण पिढीमध्ये गुडघेदुखीचा (knee pain) त्रास वाढताना दिसत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये दररोज 5-6 तरूण गुडघेदुखीची तक्रार घेऊन येत आहेत. एकंदरच राहणीमानाचा तसेच पोषक तत्वांच्या अभावामुळे (less nutrions) हा त्रास होत आहे.

गुडघ्यात कमी ग्रीस तयार होणे किंवा ग्रीस बिलकूल तयार न होणे ही स्थिती राहिल्यास वृद्धापकाळात गुडघेदुखीची समस्या अधिक गंभीर होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही फिजीओथेरपिस्ट्सच्या सांगण्यानुसार, यापूर्वीच्या काळात वयाच्या 40 व्या वर्षानंतर गुडघे दुखणे, शरीरातील हाडं दुखणे अशा समस्या उद्भवायच्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मी वयातच लोकांचे गुडघे दुखू लागले आहेत. वेळेआधीच तरुणांचे शरीर अशक्त होत चालले आहे. अनियमित दिनचर्या आणि जंक फूड, तेलकट खाद्यपदार्थ यांच्या अति सेवनामुळे होत ही परिस्थिती उद्भवली आहे. आजकाल फिजिओथेरपी घेणाऱ्यांपैकी बहुतांश लोक हे 35 ते 40 या वयोगटातील असून, त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे.

दररोज एक कप दूध पिणे गरजेचे

शरीरात कॅल्शिअमची कमतरता, मद्यपान करणे व व्यायामाचा अभाव या सर्वांमुळे तरूणांचे शरीर सुस्त होत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज एक कप दूध पिणे गरजेचे आहे. तरुणांमध्ये गुडघेदुखी सामान्यत: सांधेदुखीमुळे होत नाही. हे पेटेलोफीमोरल सिंड्रोममुळे होऊ शकते. जेव्हा काही स्नायू इतर स्नायूंपेक्षा अधिक काम करतात, तेव्हा असंतुलनामुळे गुडघेदुखी सुरू होते. तसेच बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील तरुणांमध्ये गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

नारळपाणी पिणे ठरते फायदेशीर

काही फिजिओथेरपिस्ट्सच्या सांगण्यानुसार, गुडघ्यांमधील ग्रीस (सिनोव्हिअल फ्लुइड) वाढवण्यासाठी नारळाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. कंबरदुखी व शरीरात वेदना होत असल्याची तक्रार घेऊन अनेक तरूण रुग्णालयांमध्ये येत असतात. शारीरिक काम अथवा हालचाल न केल्यामुळे तरूणांना हा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. अशा तरूणांना कॅल्शिअम, प्रोटीन्स तसेच व्हिटॅमिन्स युक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.