तरुणींनो, वेळीच कशी ओळखाल वंध्यत्वाची समस्या? अनियमित मासिक पाळीसह महत्त्वाची लक्षणं कोणती, ते जाणून घ्या!

तरुणींनो, वेळीच कशी ओळखाल वंध्यत्वाची समस्या? अनियमित मासिक पाळीसह महत्त्वाची लक्षणं कोणती, ते जाणून घ्या!
वंध्यत्व आल्याचा संशय येत असेल, तर ही माहिती अतिशय महत्त्वाची
Image Credit source: My Cure Health

डॉक्टरांच्या मते, जर एखाद्या महिलेला ओटीपोटात तीव्र वेदना होत असतील आणि मासिक पाळीही अनियमित येत असेल तर ते वंध्यत्वाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 16, 2022 | 7:04 PM

वंध्यत्व (Infertility) ही आजकालच्या महिलांसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. बदलती जीवनशैली, सकस आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष, ताणतणाव आदी विविध कारणांमुळे महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या सातत्याने वाढत आहे. इच्छा असूनही महिला वंध्यत्वामुळे गर्भधारणा करू शकत नाही. वंध्यत्वाच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जोडपी आयव्हीएफ (IVF) उपचार पद्धती घेण्यासाठी दवाखान्यात फेऱ्या मारत असतात. परंतु अनेक प्रकरणांमध्ये महिलांना खूप प्रयत्न करूनही गर्भधारणा करू शकत नाहीत. या समस्येची लक्षणे योग्य वेळी लक्षात आल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. वंध्यत्वाची समस्या का निर्माण होत असते. त्याची लक्षणे (symptoms) काय आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे. ‘Tv9 ’ने याविषयी सीके बिर्ला रुग्णालयातील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुणा कालरा यांच्याशी चर्चा केली आहे.

डॉ. अरुणा सांगतात, की जेव्हा तुम्ही गरोदर राहण्यासाठी खूप प्रयत्न करता परंतु ते शक्य होत नाही, तेव्हा वंध्यत्व येते. वंध्यत्वाचे मुख्य लक्षण म्हणजे गर्भधारणा होण्यास असमर्थता हे होय. जर तुमची मासिक पाळी खूप लांब किंवा कमी कालावधीसाठी येत असेल आणि या काळात तुम्हाला खूप वेदना होत असतील तर ते वंध्यत्वाचे लक्षण असू शकते. याशिवाय, वारंवार गर्भपात, कर्करोग उपचार किंवा एंडोमेट्रिओसिसचा इतिहास असल्यास वंध्यत्वाच्या तक्रारी असू शकतात. खालच्या ओटीपोटात खूप तीव्र वेदनादेखील त्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते. अशी कोणतीही लक्षणे शरीरात दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर लक्षणे ओळखून त्यावर उपचार करून हा आजार आटोक्यात ठेवता येतो.

कारणं काय?

  1. ओव्यूलेशन डिसऑर्डर -डॉक्टरांच्या मते, वंध्यत्वाची बहुतेक प्रकरणे वारंवार किंवा अजिबातच ओव्यूलेशन न झाल्यामुळे होतात. अंडाशयातील समस्यांमुळे ओव्यूलेशन विकार होऊ शकतात.
  2. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) : पीसीओएस ही अंडाशय आणि त्यांच्या हार्मोन्समधील बदलांशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. हार्मोन्स जास्त प्रमाणात निर्माण केले जातात. त्यामुळे अंडाशयात अनेक सिस्ट तयार होतात. या स्थितीत वजन झपाट्याने वाढू लागते आणि चेहऱ्यावर केस येण्यासारख्या समस्याही निर्माण होउ शकतात.
  3. हायपोथॅलेमिक डिसफंक्शन : जेव्हा फॉलिकल स्टिमुलेटिंग हार्मोन (FSH) आणि ल्यूटिनाइजिंग हार्मोन (LH) शरीरात योग्यरीत्या कार्य करत नाहीत तेव्हा ही समस्या निर्माण होत असते. जेव्हा असे होते तेव्हा मासिक पाळी अनियमित होते किंवा कधीकधी मासिक पाळी अजिबात येत नाही.

फॅलोपियन ट्यूबचे नुकसान :

खराब झालेल्या किंवा ब्लॉक केलेल्या फॅलोपियन ट्यूब शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. हे फॅलोपियन ट्यूबमधील नुकसान किंवा अडथळ्यामुळे होऊ शकते.

एंडोमेट्रिओसिस :

ही गर्भाशयाची समस्या असून, जेव्हा गर्भाशयाच्या अस्तराच्या टीशूंची म्हणजेच ऊतींची वाढ असामान्य होते. मग हे ऊतक गर्भाशयाच्या बाहेर पसरतात. त्यामुळे एंडोमेट्रिओसिसची समस्या निर्माण होत असते.

फॅलोपियन ट्यूब ब्लॉक :

कधीकधी गर्भाशयाच्या मुखामुळे वंध्यत्वाची समस्या देखील निर्माण होत असते. या प्रकरणात फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होऊ शकतात. ज्याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. फाइब्रॉएड किंवा पॉलीप्स असलेल्या अनेक महिला गर्भवती होतात.

(टीप – वर सांगण्यात आलेली लक्षणं ही सर्वसामान्य आढळून येणारी निरीक्षणं असून कोणत्याही उपचार आणि वेदनांबाबत आपल्या डॉक्टरांना संपर्क करावा.)

संबंधित बातम्या :

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका वाढला, भारताचे काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

महिन्याच्या ‘त्या’ वेदनांकडे दुर्लक्ष नकोच… या गंभीर आजाराचे संकेत

औरंगाबादेत रुग्णालयाच्या पायरीवरच रुग्णाचा तडफडून मृत्यू, गंगापूर तालुक्यात खळबळ

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें