AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 व्या वर्षीही 25 वर्षीय तरुणासारखा उत्साह कायम हवाय? घरगुती उपाय आहेत की!

अनेकदा वाढत्या वयासोबत आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे शरीरामध्ये अनेक बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. याचे कारण आहे शारीरिक कमजोरी, ज्यामुळे आजच्या घडीला आपल्यापैकी अनेक पुरुष त्रस्त असल्याचे पाहायला मिळते. अशावेळी आपण अनेक घरगुती उपायांचा वापर करून या समस्येपासून कायम स्वरुपी सुटका करून घेऊ शकतो.

40 व्या वर्षीही 25 वर्षीय तरुणासारखा उत्साह कायम हवाय? घरगुती उपाय आहेत की!
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 8:30 PM
Share

मुंबई :  हल्लीच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अनेक पुरुष विविध आजारांनी ग्रस्त असतात. या समस्येतून सुटका मिळण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा आधार घेतला जातो. मात्र या औषधांचा फायदा होण्याऐवजी त्यापासून होणारे नुकसानच अधिक असते. पुरुषांमध्ये येणारी कमजोरी त्यांच्या रोमॅण्टिक लाईफमध्ये सुद्धा नकारात्मक प्रभाव पाडत असते. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारची औषध वापरताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. अशा प्रकारची औषध वापरण्यापेक्षा अनेक घरगुती उपायांची मदत घेऊन तुम्ही काही प्रमाणात का होईना पण या समस्येपासून स्वतःचा बचाव करू शकता.

करा फक्त हे काही घरगुती उपाय 

दूध, खारीक आणि मखाने यांचे महत्त्व : कॅल्शियम, फायबर, झिंक, मॅग्नेशियम आणि आयर्न यांनी परिपूर्ण असणाऱ्या खारीकांचे सेवन करून पुरुष आपला स्टॅमिना वाढवू शकतात. शारीरिक रूपाने कमजोर आणि बारीक असणाऱ्या व्यक्तींसाठी खारीक एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. याशिवाय रोज खारीकचे सेवन केल्याने तुमची पचनशक्ती सुद्धा सुधारते. खारीकच्या चांगल्या परिणामांसाठी तुम्ही खारीक पावडर बनवून दुधात मिसळून सुद्धा सेवन करू शकता.

मखाने पुरुषांसाठी अतिशय लाभदायक मनले जातात हे एक आयुर्वेदिक हर्ब आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल, फॅट, फॉस्फरस अशा विविध तत्त्वांनी परिपूर्ण असणारे मखाने पुरुषांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. रोज मखान्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोन (testosterone hormone) वाढतात. त्यामुळे पुरुषांच्या शरीरात असणारी कमजोरी मोठ्या प्रमाणात कमी होते. यांमध्ये कमी कॅलरी असतात आणि त्याच्यात फायबर अधिक प्रमाणात आढळून येते. ज्याच्या माध्यमातून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतो. त्याशिवाय शरीराला आवश्यक असणारी अनेक हेल्थ बेनिफिट सुद्धा मिळतात. मखाणांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात असणारी कमजोरी दूर होते.

पोषक तत्वांनी भरपूर असलेले दूध पुरुषांसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदेमंद ठरत असते. दररोज दूधाचे सेवन केल्याने स्टॅमिना वाढतो. दुधाचे नियमित सेवन केल्यामुळे पुरुष आपला स्टॅमिना बुस्ट करू शकतात, यामुळे संपूर्ण शरीराला भरपूर एनर्जी मिळते.

या पद्धतीने करा सेवन | Consume It Like This

खारीक आणि मखाने कमीतकमी 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर एक ग्लास दूध घेऊन ग्राईंडरमध्ये ओता, आता यामध्ये खारीक आणि मखाणे टाका. ग्राइंडर पाच मिनिट सुरू ठेवा आणि एक उत्तम ड्रिंक यापासून तयार होईल. दररोज याचे सेवन केल्याने काही दिवसातच याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. याशिवाय दुधात मध मिसळून त्याचे सेवन केल्याने सुद्धा स्टॅमिना वाढतो, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये अश्वगंधा सुद्धा मिसळू शकता.

या ड्रिंक्सचे सेवन करण्याचे अन्य फायदे

हे ड्रिंक पचनक्रिया सुधारण्यासाठी लाभदायी ठरते. अपचनाची समस्या सुद्धा याने ठीक होते, या ड्रिंकमध्ये मिसळण्यात आलेले खाद्यपदार्थ फायबरने परिपूर्ण आहेत. फायबर पचन क्रिया सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त समजले जाते. अनिद्रासारखी समस्या सुद्धा याने ठीक होते. या ड्रिंकमध्ये स्लीपिंग हार्मोनला बुस्ट करण्याचे गुण आढळतात हे ड्रिंक गाढ झोप येण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

टिप्स : वरील माहिती ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या विविध ग्रंथांच्या आधारे सांगण्यात आलेली आहे परंतु प्रत्यक्ष उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. टीव्ही9 तुम्हाला कोणतेही उपचार घरी करणे किंवा घरी कोणत्याही प्रकारची औषधे सेवन करण्याचा अजिबात सल्ला देत नाही.

संबंधित बातम्या 

कोविड सेल्फ टेस्ट किटमुळे धोका वाढला, रुग्ण करतायेत घरातच टेस्ट; मुंबईमध्ये किटवर बंदी

‘होय! अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला’, करीनापासून लारा दत्तापर्यंत, कोणती अभिनेत्री काय म्हणाली?

Corona : अशी ओळखा डेल्टा, ओमिक्रॉनची लक्षणे; लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.