Side Effects of Egg : तुम्हीही दररोज अंडी खात आहात? तर सावधान ‘या’ समस्या वाढवू शकतात!

अंडे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह इत्यादी सर्व पोषक घटकांमध्ये असतात, जे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असतात. मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही.

Side Effects of Egg : तुम्हीही दररोज अंडी खात आहात? तर सावधान 'या' समस्या वाढवू शकतात!
अंडी
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 10:31 AM

मुंबई : अंडे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह इत्यादी सर्व पोषक घटकांमध्ये असतात, जे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असतात. मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. जर तुम्हालाही अंडी खाण्याची आवड आहे, तर त्याचे दुष्परिणाम नक्की जाणून घ्या. (Eating egg daily is dangerous to health)

1. अंड्याचा पांढरा भाग कमी कॅलरीयुक्त असतो. पण खरं तर या पांढऱ्या भागाचे अनेक तोटे आहेत. अंड्याच्या पांढऱ्या भागाचे सेवन केल्याने पुरळ, त्वचेवर सूज आणि लालसरपणा, पेटके, अतिसार, खाज सुटणे इत्यादी समस्या असू शकतात. ज्या लोकांना आधीच अॅलर्जीची समस्या आहे, त्यांनी अंड्यांचे सेवन करू नये.

2. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यामुळे किडनीच्या समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी ते हानिकारक आहे. खरं तर, मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे ग्रस्त लोकांमध्ये GFR कमी प्रमाणात असते. अंड्याचा पांढरा भाग GFR आणखी कमी करतो. यामुळे मूत्रपिंड फिल्टर करण्यात समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत किडनीच्या रुग्णांसाठी समस्या वाढू शकते.

3. अंड्याच्या पांढऱ्या भागात अल्ब्युमिन असते. यामुळे, शरीराला बायोटिन शोषण्यात अडचण येते, अशा परिस्थितीत स्नायू दुखणे, त्वचेच्या समस्या, केस गळणे इत्यादीशी संबंधित समस्या वाढू शकतात.

4. अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्टेरॉल आणि चरबीचे जास्त प्रमाण आढळते. जर तुम्ही दररोज दोनपेक्षा जास्त अंडी खाल तर कोलेस्टेरॉल वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. हृदयाच्या समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी टाळावीत.

हेही वाचा! 

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. बऱ्याचदा व्यायामानंतर उकडलेली अंडी खाताना पिवळा भाग बाजूला काढूनच अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

त्यामागे वजन आणि चरबी वाढेल अशी कारण सांगितली जातात. उलट त्या पिवळ्या भागामध्ये बरेच काही साामावलेलं असतं. पिवळ्या भागामध्ये पांढऱ्या भागापेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतात. अंड्याचा पिवळा भाग खाण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating egg daily is dangerous to health)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.