Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खजुरा पेक्षाही जास्त फायदेशीर आहेत त्याच्या बिया, आरोग्यसह त्वचा आणि केसांनाही होतो त्याचा फायदा

आरोग्याचा खजिना म्हटले जाणारे खजूर नाश्त्यामध्ये खाल्ले जातात. तसेच गोड पदार्थ तयार करताना याचा वापर केला जातो. ऊर्जा वाढवण्यासाठी खजुराचा आहारात समावेश केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की खजूर जेवढे फायदेशीर आहे तितकेच त्याच्या बिया देखील फायदेशीर आहेत. पण अनेकांना हे माहिती नसल्याने ते खजुराच्या बिया टाकून देतात.

खजुरा पेक्षाही जास्त फायदेशीर आहेत त्याच्या बिया, आरोग्यसह त्वचा आणि केसांनाही होतो त्याचा फायदा
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 3:41 PM

खजूर हे नाव ऐकताच आपल्या मनात आरोग्य आणि चवीचे विचार येतात. निसर्गाची कँडी म्हणूनही खजुराची ओळख आहे. पोषक तत्वांनी समृद्ध आणि ऊर्जेच्या उत्कृष्ट स्त्रोत म्हणजे खजूर मानले जाते. हिवाळ्यात शरीराला गरम करण्यासाठी असो किंवा गोडधोडाने भरलेला कोणताही पदार्थ तयार करणे असो खजूर सर्वत्र वापरले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की खजूर जितके फायदेशीर आहेत तितकेच त्याच्या बिया देखील उपयोगी असू शकतात. अनेक जण खजुर खाल्ल्यानंतर त्याच्या बिया टाकून देतात. खजुराच्या बियांमध्ये भरपूर पोषक आणि औषधी गुणधर्म असतात ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे करू शकता. जाणून घेऊ खजुराच्या बिया कशा वापरल्या जाऊ शकतात आणि ते आपल्या निरोगी तसेच दैनंदिन जीवनासाठी किती फायदेशीर ठरू शकतात.

हेल्दी ड्रिंक म्हणून पावडर बनवणे खजुराच्या बिया वाळवून आणि बारीक करून पावडर बनवता येते. या पावडरचा वापर तुम्ही कॉफी सारखे पेय तयार करण्यासाठी करू शकता. कॅफिन मुक्त असण्याव्यतिरिक्त ते अँटिऑक्सिडंटने देखील समृद्ध आहे.

त्वचा आणि केसांची काळजी खजुराच्या बियांची पावडर स्क्रब म्हणून वापरली जाऊ शकते. ही पावडर मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचा चमकदार बनवते. त्याचे तेल केस मजबूत करण्यासाठी आणि केस गळणे टाळण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

पचनासाठी फायदेशीर खजुराच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. याचे पावडर स्वरूपात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

नैसर्गिक खत खजुराच्या बिया वाळवून त्या मिक्सर मधून काढून त्याचा नैसर्गिक खत म्हणून वापर केला जाऊ शकतो. यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते आणि वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते.

खजुराच्या बियांचे फायदे अँटिऑक्सिडंटने समृद्ध: खजुराच्या बियांमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात जे शरीराला मुक्त रॅडिकल्स मुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.

रक्तातील साखरेचे नियंत्रण: हे रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत करते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते: याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर: खजुराच्या बियांची पावडर कोलेस्टॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

खजुराच्या बियांची पावडर कशी तयार करायची?

खजुराच्या बिया चांगल्या प्रकारे धुवून त्या उन्हात वाळवा. कोरड्या झाल्यानंतर त्यांना हलके भाजून घ्या जेणेकरून त्यांचा ओलावा पूर्णपणे निघून जाईल. थंड झाल्यावर या बिया मिक्सरमधून बारीक करून त्याची पावडर बनवा. ही पावडर एका हवाबंद डब्यात ठेवा.

'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'.